पुढारी ऑनलाईन : दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक हास्य दिवस साजरा केला जातो. यावर्षीदेखील 'जागतिक स्माईल डे' साजरा केला जात आहे. यादिवसाची यावर्षीची थीम (World Smile Day 2022) ही 'दयाळूपणाचे कार्य करा, एका व्यक्तीला हसण्यास मदत करा ("Do an act of kindness. Help one person smile") अशी आहे. या दिवसाची सुरुवात अमेरिकन ग्राफिक आर्टिस्ट 'हार्वे बॉल'ने केली होती. त्यांने 1963 मध्ये त्यांच्या जाहिरात एजन्सीच्या माध्यमातून आपल्या एका क्लायंटसाठी पहिले स्मायली इमोजी तयार केले होते.
अमेरिकन ग्राफिक आर्टिस्ट 'हार्वे बॉल याने एका विमा कंपनीसाठी हसरा चेहरा ? तयार केला. कारण कंपनीला आपल्या कर्मचार्यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक छायाचित्र तयार करायचे होते. म्हणून त्याने आपण नेहमी वापरत असलेली पहिली स्मायली ईमोजी तयार केली. त्यानंतर बॉलच्या लक्षात आले की, स्मायली इमोजीचे व्यावसायिकीकरण होत आहे. यामुळे या इमोजीमागील वास्तविक विचाराचा अर्थ म्हणजे हसण्याची शक्ती कमी होईल. पण यानंतर चेन, बॉल्स, कपडे, कॉमिक, बुक्स, कॉफी मग, डायरी, क्रोकरी आणि बरेच काही गोष्टींमध्ये 'स्माईली ईमोजी'? चिन्ह मोठ्या प्रमाणात वापरले जाऊ लागले. त्यामुळे वर्षातील एक दिवस तरी हसत खेळण्यासाठी समर्पित करावा असेया कलाकाराला वाटले. म्हणून 1999 पासून दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्या शुक्रवारी जागतिक स्माईल डे (World Smile Day 2022) अस्तित्वात आला.
अमेरिकन ग्राफिक आर्टिस्ट हार्वे बॉलच्या मृत्यूनंतर त्यांच्या स्मरणार्थ 2001 मध्ये 'हार्वे बॉल वर्ल्ड स्माइल फाउंडेशन' या नावाने एक फाउंडेशन तयार करण्यात आले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून लहान, तळागाळातील धर्मादाय संस्थांसाठी फंड उभारण्याचे काम केले जाते.
लोकांना दयाळूपणाची कृत्य आणि कार्य करण्यास प्रोत्साहित देण्यासाठी आणि दुसऱ्या व्यक्तीला आनंद देण्यासाठी हा दिवस (World Smile Day 2022) साजरा केला जातो. हसणे आणि हसवणे एखाद्याचे संपूर्ण आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. तसेच लोकांमध्ये सकारात्मकता, कृतज्ञता आणि मैत्रीची भावना वाढवण्यास मदत करते. म्हणून आपणही आजच्या दिवशी संकल्प करूया स्वत:च्या आरोग्यासाठी, तणावमुक्तीसाठी हसू या आणि इतरांनाही हसवूया.