Nashik : 40 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन | पुढारी

Nashik : 40 वर्ष जुन्या पिंपळ वृक्षाची कत्तल केल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
किशोर सुधारालयालगतच्या 30 ते 40 वर्षे जुन्या पिंपळ वृक्षाची छाटणीच्या नावाने निर्दयपणे कत्तल करण्यात आली, असा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी गुरुवारी (दि.6) आंदोलन केले. शहरातील अवैध वृक्षतोड आता खपवून घेतली जाणार नाही, वृक्षतोड होत असेल तर नागरिकांनी न घाबरता कागदपत्रांची मागणी करावी. व त्वरित पालिकेला फोन करून अवैध वृक्षतोड थांबवावी असे आव्हान पर्यावरणप्रेमींनी केले.

शासकीय जागेतील वृक्षाचा वाहतुकीला अडथळा नसतानाही ठेकेदाराकडून कुर्‍हाड चालविण्यात येत असल्याची माहिती मिळताच पर्यावरणप्रेमींनी घटनास्थळी धाव घेत मज्जाव केला. या वृक्षाची पाहणी केली असता त्यावर पक्ष्यांची घरटी आढळून आली. वृक्षतोड करताना उद्ध्वस्त झालेली बगळ्यांची घरटी जिल्ह्यातील ही घटना ताजी असताना शासकीय कार्यालयांनाच वनविभागाची परवानगी घ्यावयाचा विसर पडावा ही खेदजनक बाब असल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले. दरम्यान, शासकीय इमारातीच्या आवारातील पिंपळ वृक्षतोडीबद्दल मनपा उद्यान आयुक्त विजयकुमार मुंडे यांची पर्यावरणप्रेमींनी भेट घेतली.

हेही वाचा :

Back to top button