Happy Dasara : मराठमोळ्या अभिनेत्री म्हणतात-सोनं घ्या, सोन्यासारखं रहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : दसऱ्याची धामधूम सगळीकडेच सुरु आहे. (Happy Dasara) काही ठिकाणी रावणाचे दहन करण्यासाठीची तयारी जोरदार सुरू आहे. दसऱ्याच्या खास दिनाच्या औचित्याने मराठी अभिनेत्रींनी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत. काही अभिनेत्रींनी व्हिडिओ केला आहे तर काहींनी फोटो पोस्ट करून विजयादशमीच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या शुभेच्छा इन्स्टाग्रामवर पाहता येईल. (Happy Dasara)
यामध्ये अपूर्वा नेमळेकर ते सायली संजीवपर्यंत अभिनेत्रींचा समावेश आहे.
अपूर्वा नेमळेकर म्हणाली- सांगता नवरात्राची,जल्लोष विजयाचा.. मुहूर्त एक,सण दसऱ्याचा..✨ ☘️शुभ दसरा☘️
सोनाली पाटीलने व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये ती म्हणते- समदेइले दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा 💕❤️
प्रार्थना बेहरे हिने स्काय ब्ल्यू रंगाची सुंदर साडी परिधान केलीय. शुभेच्छा देतानाचे काही फोटोज तिने इन्स्टाग्रामला शेअर केले आहेत. तिने या फोटोंना कॅप्शन लिहिलीय-तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..! तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो.. Happy Dasara..!
अनेक मराठमोळ्या अभिनेत्री विजयादशमीच्या शुभेच्छा देताना दिसताहेत.
- सेतू बांधा रे सागरी…
- पाच लाख वर्षांपूर्वीच्या हत्तीचा दात
- शिर नसलेल्या सांगाड्यांची हजारो वर्षांपूर्वीची दफनभूमी
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram