Anaya Soni : टीव्ही अभिनेत्री अनया सोनी रुग्णालयात दाखल, किडनी फेल झाल्याची दिली माहिती | पुढारी

Anaya Soni : टीव्ही अभिनेत्री अनया सोनी रुग्णालयात दाखल, किडनी फेल झाल्याची दिली माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही इंडस्ट्रीत काम करणाऱ्या कलाकारांनादेखील कधी कधी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. कधी कधी त्यांचे शॉट्स दीर्घ असतात, ज्याचा परिणाम थेट त्यांच्या आरोग्यावर पडतो. आता टीव्ही अभिनेत्री अनन्या सोनीलादेखील कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागते. तिने सोशल मीडियावप एक पोस्ट टाकली आहे, ज्यामध्ये तिने आपल्या प्रकृतीबद्दल लिहिले आहे. तिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले की, तिची प्रकृती खूप खराब झाली आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.

अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) ने टीव्ही शो ‘मेरे साईं’मध्ये मुख्य भूमिका साकारली होती. तिची तब्येत सेटवरच बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल केले आहे. अनन्या सोनी ‘मेरे साईं’ च्या सेटवर शूटिंग करत होती, तेव्हा ती बेशुध्द झाली. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले.

मीडिया रिपोर्टनुसार, अनन्या सोनीच्या वडिलांनी सांगितले की, अनाया सोनीची एक किडनी खराब झाली आहे. तिची किडनी बदलायला हवी. सध्या ती डायलिसिसवर आहे. तिच्या वडिलांनी हेदेखील सांगितले की, सध्या त्यांची आर्थिक स्थिती ठीक नाही. ती खूप काळजीत आहे. त्यांच्याकडे अनयाच्या उपचारासाठी पैसे नाहीत. त्यानंतर अनायाने एक इन्स्टास्टोरी पोस्ट केली. त्यानंतर फॅन्स खूप चिंतेत होते.

सोशल मीडियावर व्यक्त केलं दु:ख

अनायाने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे, यामध्ये तिने आपल्या तब्येतीविषयी सांगितलं. अनाया सोनीने लिहिलं, ‘डॉक्टर म्हणत आहेत की, माझी किडनी फेल झाली आहे आणि मला डायलिसिसवर जायला हवं. क्रिएटिनिन १५.६७ आणि हिमोग्लोबिन ६.७ झाले आहे. स्थिती खूप गंभीर आहे. सोमवारपासून मी अंधेरी पूर्व स्थित होली स्पीरिट रुग्णालयात उपचारासाठी जात आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आयुष्यासाठी जीवनाचा प्रवास इतका सोपा राहिलेला नाही. परंतु, प्रत्येक क्षण एन्जॉय करत मी आयुष्य जगत होते. मला माहिती होतं की, ही वेळ येणार आहे. पण, लवकरच ही वेळ निघून जाईल. लवकरचं किडनी ट्रान्सप्लांट करेन. डायलिसिसनंतर किडनीसाठी अॅप्लाय करेन’.

Back to top button