Bigg Boss-16 : सुंबूल, टीना की निम्रत, कोण आहे हाएस्ट पेड कंटेस्टेंट? | पुढारी

Bigg Boss-16 : सुंबूल, टीना की निम्रत, कोण आहे हाएस्ट पेड कंटेस्टेंट?

पुढारी ऑनलाईन डेस्क : सलमान खान (Salman Khan) च्या जबरदस्त, धमाकेदार शो बिग बॉस सीजन- १६ ची धमाकेदार सुरुवात झालीय. १ ऑक्टोबर रोजी शोचे ग्रँड प्रीमियर होतं. सलमान खानने या शोमधील कंटेस्टेंट्सचं स्वागत केलं. सुंबुल तौकीर (Sumbul Touqeer) ते अंकित गुप्ता (Ankit Gupta) पर्यंत, शोमध्ये यंदाही अनेक सेलेब्सनी एंट्री घेतली आहे. शोमध्ये ज्या सेलेब्सने एंट्री घेतली, त्यांच्या मानधनाची चर्चादेखील सुरू झाली आहे. आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे की, बिग बॉसच्या घरातील कोणता स्पर्धक सर्वात अधिक मानधन घेतो. (Bigg Boss-16)

‘बिग बॉस’च्या घरात असलेल्या सेलिब्रिटींमध्ये सर्वाधिक फी कोण घेत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, शोची सर्वात तरुण स्पर्धक सुंबूल तौकीर या सीझनसाठी सर्वाधिक पैसे घेत आहे. बिग बॉसच्या घरात जबरदस्त एन्ट्री केलेली सुंबूल या शोसाठी दर आठवड्याला १२ लाख रुपये घेत आहे. त्याचबरोबर या यादीत दुसरे नाव आहे उतरन फेम टीना दत्ताचे. शोची सर्वात मजबूत स्पर्धक मानली जाणारी टीना शोसाठी दर आठवड्याला ८ ते ९ लाख रुपये घेते.

उडियान फेम अभिनेता अंकित गुप्ताही फीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. या शोसाठी ती दर आठवड्याला ५ ते ६ लाख रुपये आकारत आहे. त्याचबरोबर अभिनेत्री प्रियांका चहर चौधरीदेखील दर आठवड्याला जवळपास ५ लाख फी आकारत आहे. छोटी सरदारनी फेम निम्रत कौर अहलुवालिया देखील अधिक मानधनामुळे चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ती दर आठवड्याला ७ ते ८ लाख मानधन घेत आहे.

फराह खानचा भाऊ आणि चित्रपट निर्माता साजिद खानही फीच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. या शोसाठी तो दर आठवड्याला ४ ते ५ लाख रुपये घेत आहे. फेमिना मिस इंडिया रनर अप मान्या सिंग शोच्या प्रत्येक आठवड्याला ६-७ लाख पैसे घेत आहे. तर सौंदर्या शर्मा ४-५ लाख मानधन घेत असल्याची चर्चा आहे.

 

Back to top button