Ironman Competition : उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी पटकावला आयर्नमॅनचा किताब | पुढारी

Ironman Competition : उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी पटकावला आयर्नमॅनचा किताब

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: हिंगोली जिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी कोल्हापूर येथे झालेल्या सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेत यश संपादन केले.  ते हिंगोली जिल्हा प्रशासनात आयर्नमॅनचा किताब (Ironman Competition)  पटवणारे पहिले अधिकारी ठरले आहेत.

क्रीडाप्रेमी अशी ओळख असलेले उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी  (Ironman Competition) यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा प्रकारामध्ये सहभाग घेऊन त्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. उमाकांत पारधी यांनी आयर्नमॅन होण्याचे स्वप्न साकारण्यासाठी प्रशासनातील कामकाज सांभाळत रिकाम्या वेळी सराव केला. कोल्हापूर येथे रविवार २ ऑक्टोबररोजी आयोजित हाल्फ आयर्नमॅनच्या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेकरिता भारतामधील तब्बल ७५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सहभागी स्पर्धकांना २ किमी पोहणे, ९० किमी सायकलिंग करणे आणि २१ किमी धावण्याकरिता १० तासांचा निर्धारित वेळ देण्यात आला होता.

यात उमाकांत पारधी यांनी १ तास ७ मिनिटात २ किमी पोहणे, ३ तास ९ मिनिटांत ९० किमी सायकलिंग आणि २ तास ४८ मिनिटांत २१ किमी धावण्याचा विक्रम करून केवळ ७ तास ५६ मिनिटांत स्पर्धा पूर्ण करून हाल्फ आयर्नमॅनचा किताब आपल्या नावावर कोरला. त्यांच्या या अद्वितीय यशामुळे ते हिंगोली जिल्हा प्रशासनात हाल्फ आयर्नमॅनचा ‘किताब पटकवणारे पाहिले अधिकारी ठरले आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button