BBM-4 : Arrogant बोलू नकोस, अपूर्वा-प्रसाद जवादे यांच्यात होणार भांडणं

apurva nemalekar
apurva nemalekar
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अपूर्वा आणि प्रसाद जवादेमध्ये आज मत देण्यावरून कडाक्याचे भांडणं होताना दिसणार आहे. या मुद्द्यावरून अपूर्वा आणि प्रसाद एकमेकांना जाब विचारताना दिसणार आहेत. आता कुठे पाहिला दिवस आणि सदस्यांनी आपल्याविरोधात मत दिले हे त्यांना सहन होत नाहीये. पुढे टास्क सुरु झाल्यावर काय परिस्थिती होणार आहे? किती वाद – विवाद बघायला मिळतील हे कळेलच. अपूर्वाने तिचे मत सांगायला सुरुवात केली पण कुठेतरी ते प्रसादला पटलं नाही आणि त्यांच्यात मतभेद असल्याचं दिसून आले. अपूर्वाचे म्हणणे आहे, हा कुस्तीचा खेळ नव्हे, आणि तुला असं का वाटतं कि तू (योगेश जाधव) त्याच्यापेक्षा बेटर आहेस? प्रसादचं म्हणणं पडलं जर हा कुस्तीचा खेळ नाहीये तर मग… अपूर्वा यावरून प्रसादवर भडकली "तू बोलू देणार आहेस का मला कि स्वतः एकटाच बोलणार आहेस?" आणि वाद वाढतच गेला प्रसाद म्हणाला, "तू बोलीस त्यावर मी उत्तर दिलं तुला मी फक्त फास्ट ऐकलं बाकी काही नाही".

त्यावर शब्दाला शब्द वाढतं गेला अपूर्वाचे म्हणणे पडले "तू बोल Respected, आता शांतपणे मी काय बोलते ते पण ऐक…हा कुस्तीचा खेळ नसल्याने त्याच्या बॉडीवर त्याला judge करणं मला अत्यंत चुकीचं वाटतं, तो स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच मला त्या स्ट्रॉंग स्पर्धकासोबत खेळायला जास्त आवडेल rather than तुझ्या Arrogance बरोबर. प्रसादला अपूर्वाचे हे म्हणणे पटले नाही, त्यावर तो म्हणाला "arrogance वैगरे अजिबात बोलू नकोस"…अपूर्वा म्हणाली, बोटं खाली करून बोल माझ्याशी, मला बिग बॉस यांनी माझं मत विचारलं मी तुझ्याविरोधात मत दिले."

आज बघूया कोणी कोणाविरोधात मत दिले? कोणामध्ये वाद झाले? कोण कोणाशी सहमत झाले.?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news