Vikram Vedha : ‘विक्रम वेधा’ आतापर्यंतचा सर्वात आवडता चित्रपट- सुजैन खान | पुढारी

Vikram Vedha : 'विक्रम वेधा' आतापर्यंतचा सर्वात आवडता चित्रपट- सुजैन खान

पुढारी ऑनलाईन डेस्क : ह्रतिक रोशन आणि सैफ अली खान यांच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली आहे. कारण त्यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट आज ( दि.३० ) प्रदर्शित झाला. या चित्रपटाला त्यांच्या फॅन्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रफट तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. समिक्षांच्या व्यतिरिक्त बऱ्याच सेलिब्रिटींनी या चित्रपटाबद्दल आपली मत व्यक्त केली आहेत. करिना कपूर, राकेश रोशन नंतर आता सुजैन खाननेही तिचा पहिला नवरा ह्रतिक रोशनला या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. पण तिच्या एका क्षुल्लक कारणामुळे तिला सोशल मीडिया युजर्सने तिला ट्रोल केले आहे.

Vikram Vedha : हा चित्रपट हिट होईल – सुजैन खान

 सुजेन खानने ऋतिक रोशनच्या ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर बोलत असताना तिने ऋतिक रोशन आणि सैफ अली खानचे पोस्टर शेअर केेले आहे. आणि आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, हा चित्रपट आतापर्यंतच्या चित्रपटातील सर्वात आवडता चित्रपट आहे. या चित्रपटात मनोरंजन आणि थ्रिलर आहे. या मनोरंजन चित्रपटासाठी ऋतिक रोशन आणि त्याच्या टिमचे अभिनंदन केले आहे आणि म्हटले आहे हा चित्रपट नक्कीच हिट होईल.

ही पोस्ट आपल्या इन्स्टारग्रामवर शेअर करत ऋतिक रोशन आणि सैफ अली खान फॅन्स यांना टॅग केले आहे. यावरुन तिला सोशल मीडिया युजर्सने तिला ट्रोल केले आहे.  ‘विक्रम वेधा’ चित्रपटात सैफ आणि हृतिकशिवाय राधिका आपटे, शारीब हाश्मी, रोहित सराफ आणि योगिता बिहानी हे मुख्य भूमिकेत आहेत. ‘विक्रम वेधा’चं लेखन आणि दिग्दर्शन पुष्कर-गायत्री यांनी केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sussanne Khan (@suzkr)

हेही वाचलंत का?

Back to top button