UPI transactions | चुकीच्या अकाउंटवर गेलेले पैसे २४ तासांत परत मिळतील, जाणून घ्या कसे? | पुढारी

UPI transactions | चुकीच्या अकाउंटवर गेलेले पैसे २४ तासांत परत मिळतील, जाणून घ्या कसे?

नवी दिल्ली : यूपीआय (UPI transactions) अथवा नेट बँकिंगच्या माध्यमातून मनी ट्रांजॅक्शन म्हणजे पैशांची देवाणघेवाण करणे खूप सोपे झाले आहे. UPI च्या माध्यमातून काही सेकंदात तुम्ही कोणाच्याही अकाउंटवर अथवा मोबाइल नंबरवर पैसे ट्रान्सफर करु शकता. ही सेवा मोफत आहे. पण पैसे ट्रान्सफर करताना एक छोटी चूक झाली तर त्याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो. अनेकवेळा या समस्येला लोकांना सामोरे जावे लागते. कधीकधी मनी ट्रांजॅक्शन दरम्यान पैसे चुकीच्या अकाउंटवर जातात. या पार्श्वभूमीवर आरबीआयने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार २४ तासांच्या आत चुकीने ट्रान्सफर झालेले पैसे तुम्ही परत मिळवू शकता.

अशी करा नोंदवा तक्रार….

UPI transactions अथवा नेट बँकिंग केल्यानंतर स्मार्टफोनवर जो मेसेज येतो ते सेव्ह करुन ठेवा. तो डिलीट करु नका. हा मेसेज PPBL नंबर असतो. पैसे रिफंड मिळवण्यासाठी या नंबरची गरज पडते. RBI ने याबाबत जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये म्हटले आहे की जर का चुकीने कोणाच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले तर bankingombudsman.rbi.org.in वर तक्रार नोंदवा. त्यासोबतच एक पत्र लिहून बँकेत द्यायला हवे. त्यात तुम्हाला अकाउंट नंबर, नाव तसेच ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची माहिती द्यावी.

चुकीच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर पहिल्यांदा याची माहिती हेल्पलाइन नंबरवर द्या. बँकेत फोन करुन तुम्हाला चुकीच्या ट्रांजॅक्शनची संपूर्ण माहिती द्यायला हवी. अशा प्रकरणात रिसीवरच्या बँकेच्या शाखेत जाऊन व्यवस्थापकाशीदेखील चर्चा करु शकता. त्यांना पैसे परत पाठवण्यासाठी विनंती करु शकता.

हे ही वाचा :

Back to top button