

गुवाहाटी: पुढारी ऑनलाईन : म्यानमारमध्ये आज (दि.३०) पहाटे ३.५२ वाजण्याच्या सुमारास ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला. मणिपूर, नागालँड आणि दक्षिण आसामसह ईशान्येकडील भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान यात कोणतीही जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, म्यानमारमध्ये पहाटे ३. ५२ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. १४० किमी खोलीवर २३.०९ अंश उत्तर अक्षांश आणि ९५.०१ अंश पूर्व रेखांशावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
ईशान्येकडील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचलंत का?