वागले की दुनिया - हिरोपेक्षा उंचीने लहान असणाऱ्या अभिनेत्रींसाठी खास जुगाड | पुढारी

वागले की दुनिया - हिरोपेक्षा उंचीने लहान असणाऱ्या अभिनेत्रींसाठी खास जुगाड

पुढारी ऑनलाईन डेस्क – आपण काही वेळा पाहतो की, मालिकांमध्ये उंचपुरे अभिनेते असतात. तर त्याच मालिकेत अभिनेत्री काही उंचपुऱ्या तर काही फार कमी उंचीने असतात. लहान उंचीमुळे अनेकदा अभिनेत्रींना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी त्यांच्यासाठी खास जुगाड केला जातो. तो काय जुगाड आहे पहा.

गप्‍पागोष्‍टी करताना मालिकेमधील नायिकांनी पडद्यागामील जुगाडबाबत सांगितले, जे त्‍यांना त्‍यांच्‍या लहान उंचीमुळे करावे लागले आहे. उंचीमधील फरक दूर करण्‍यासाठी अभिनेत्री परिपूर्ण सीन देताना फूटस्‍टूलवर (पाट) उभे राहून संवाद सादर करतात. अभिनेत्यांसोबत सीन्‍स करताना परिवा प्रणती (वंदना), चिन्‍मयी साळवी (सखी) व मानसी जोशी (यामिनी) फूटस्‍टूलवर उभ्‍या राहतात. लहानसा सीक्‍वेन्‍स असतानादेखील त्‍यांच्‍यासाठी फूटस्‍टूल द्यावा लागतो. याच कारणामुळे या तिघींना प्रेमाने ‘शॉर्टी स्‍क्‍वॉड’ म्‍हटले जाते.

शूटिंगदरम्‍यान या प्रेमळ व हलक्‍याफुलक्‍या कारणासाठी सर्व कलाकार व टीम सदस्‍य उत्साहपूर्ण क्षणाचा आनंद घेतात. आपल्‍याला माहितच आहे की, टीम मालिकेसाठी काम करताना धमाल करण्‍यास कधीच चुकत नाही.

वंदनाची भूमिका साकारणा-या परिवा प्रणती म्‍हणाल्‍या, ‘’कोणत्‍याही सीनमध्‍ये सुमीत (राजेश वागले) व माझ्यात संवाद असताना आणि मला बोलताना वर पाहण्‍याची गरज असताना आम्ही न हसण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करतो. शीहानची (अथर्व वागले) उंची देखील तितकीच असून आमच्‍या खांद्याच्‍या उंचीपर्यंत आहे. माझ्यासाठी स्‍टूल आणल्यानंतर आम्‍ही खूप धमाल करतो. चिन्‍मयीची (सखी वागले) जिवलग मैत्रिण व आम्‍ही टीममधील अभिमानी शॉर्टीज आहोत. मला आमच्‍या मालिकेबाबत आवडणाऱ्या गोष्‍टींमध्‍ये ही निश्चितच माझी आवडती आठवण असेल.’’

Back to top button