मंत्री प्रल्हाद पटेल, विखे पाटील आज श्रीरामपूरात | पुढारी

मंत्री प्रल्हाद पटेल, विखे पाटील आज श्रीरामपूरात

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल व महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री, पालकमंत्री, अहमदनगर ना.राधाकृष्ण विखे पाटील हे आज श्रीरामपूर दौर्‍यावर असून त्यांच्या उपस्थितीत उद्या श्रीरामपूर शहरात विविध कार्यक्रमाचे नियोजन केले असल्याची माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिली. आज (दि. 29) रोजी दुपारी 12.30 वाजता, स्वयंवर मंगल कार्यालय, सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर येथे केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा होणार आहे. तर दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नगरपरिषद, छत्रपती शिवाजी महाराज रोड, श्रीरामपूर येथे व्यापारी, सहकार, डॉक्टर्स, बार कौन्सिल असोसिएशन, केमिस्ट, इंजिनिअर्स बांधवांसोबत परिसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

त्यानंतर सायंकाळी 4 वाजता प्रशासकीय भवन येथे राज्य शासनाच्या शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची बैठक होणार असल्याचे पटारे यांनी सांगितले. या मेळाव्यास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्ष, श्रीरामपूरच्या वतीने करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमात भाजपाचे पदाधिकारीही मार्गदर्शन करणार आहेत.

Back to top button