Hina Khan : हिनाची बिकिनी पोझ; स्विमिंग पुलात जाळ धूर संगटचं 🔥 | पुढारी

Hina Khan : हिनाची बिकिनी पोझ; स्विमिंग पुलात जाळ धूर संगटचं 🔥

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री हिना खानच्या सौंदर्याने सर्वांनाच वेड लावलं आहे. सोशल मीडियावरील तिची पोस्ट बघता बघता व्हायरल होते. तिचा कातिल अंदाज प्रत्येकाला भावणारा आहे. डान्सिंग, सिंगिंग ते ॲक्टिंग, सगळ्यात ती फर्स्ट क्लास आहे. आता पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्राम अकाऊंवर आपला जलवा दाखवला आहे. (Hina Khan) मलदीवच्या स्विमिंग पुलात ती पोहण्याचा आनंद घेताना दिसतेय. हिना मालदिवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. ती तिचा बॉयफ्रेंड रॉकीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करतेय. या अभिनेत्रीने पुलाच्या आतमध्ये फोटोशूट केले आहे. ती कॅमेराकडे पाहून पोज देताना दिसतेय. ती या फोटोंमध्ये स्माईल करताना दिसतेय. तिने फोटोंन कॅप्शनदेखील लिहिलीय की- मी पुलाला माझी रूम बनवली आणि थोडंस अंथरुण. थोडा वेग‍ळा विचार करण्याविषयी प्रयत्न करत आहे. हाहाहहा… (Hina Khan)

चार-पाच फोटो पाहिल्यानंतरबी फॅन्सदेखील तिचे कौतुक करता करता थकत नाहीत. ‘पंचायत’ फेम सुनीता राजवरने लिहिलं खूप प्रेमळ. तर मौनी रॉयने रेड हार्ट आणि फायर इमोजींचा पाऊस पाडला. फॅन्सनेदेखील तिच्या अदा पाहून प्रेमाचा वर्षाव करणं सुरू केलं आणि कमेंट सेक्शन कौतुकाने भरून टाकलं.

हिना खानने ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये अक्षराची भूमिका साकारून प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. अनेक वर्षे टीव्ही अभिनेत्री म्हणून काम केल्यानंतर तिने कलर्स टीव्हीवरील रिॲलिटी शो ‘बिग बॉस ११’ आणि ‘खतरों के खिलाडी’ मध्ये भाग घेतला होता. दोन्ही शोमध्ये ती रनरअप होती.

‘इंडियन आयडल’चं ऑडिशन

हिनाने एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी के २’ मध्ये कोमोलिकाची भूमिका केली होती. ती हॅक्ड, अनलॉक, विशलिस्ट, लाईन्स यासारख्या चित्रपटातही दिसली. तिने २००८ मध्ये इंडियन आयडलचे ऑडिशनदेखील दिले होते. टॉप ३० कंटेस्टेंटच्या यादीत तिचे नाव होते. ती नागिन-५ मध्येही दिसली होती.

अधिक वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

Back to top button