‘धर्म योद्धा गरूड’ : फैजलने गरूडचा लुक धारण करण्‍यासाठी केलीय इतकी मेहनत | पुढारी

‘धर्म योद्धा गरूड’ : फैजलने गरूडचा लुक धारण करण्‍यासाठी केलीय इतकी मेहनत

पुढारी ऑनलाईन डेस्क : भव्‍य पौराणिक कथा सादर करणारी सोनी सबवरील मालिका ‘धर्म योद्धा गरूड’ मोहक कलाकार व क्रिएटिव्‍ह कथानकासाठी ओळखली जाते. गरूडची भूमिका साकारणारा प्रमुख अभिनेता फैजल खानला मालिकेसाठी त्याच्‍या लुकचा खूप अभिमान वाटतो. या लुकमधून गरूडदेवचे व्‍यक्तिमत्त्व निर्माण करण्‍यासाठी घेतलेली अथक मेहनत दिसून येण्‍यासोबत परिपूर्ण मेकअपसाठी घेतली जाणारी खबरदारी व अचूकता देखील दिसून येते.

या मालिकेसाठी शरीरयष्‍टीवर काम करण्‍यासोबत फैजल खान त्‍याच्‍या सीन्‍ससाठी पेहराव करण्‍यासाठी अथक मेहनत देखील घेत आहे. यामध्‍ये कॉन्‍टरिंग, कपाळावर मध्‍यभागी तिलक कोरणे आणि अवजड केसाचा विग घालण्‍याचा समावेश आहे. गरूडच्‍या भूमिकेसाठी या नेहमीच्‍या प्रक्रियेसोबत त्‍याचे पंख देखील महत्त्वाचे आहेत. या वास्‍तविक व भव्‍य बॉडी प्रॉपचे वजन जवळपास १४ किग्रॅ आहे आणि रिमोटच्‍या साहाय्याने नियंत्रित केले जातात. शेवटचे म्‍हणजे ७ किलो वजनाची जड आभूषणे संपूर्ण लूकमध्‍ये भव्‍यतेची भर टाकतात.

धर्म योद्धा गरूड मालिका
धर्म योद्धा गरूड मालिका

या लूकबाबत सांगताना फैजल खान (गरूड) म्‍हणाला, ‘’मी माझी भूमिका ‘गरूड’साठी माझ्या शरीरयष्‍टीवर मेहनत घेतली. लूकमध्‍ये जाण्‍याची प्रक्रिया मोठी, पण धमाल आहे. माझ्या मेकअपमध्‍ये तीन टप्‍प्‍यांचा समावेश आहे – बेस, फेस कॉन्‍टरिंग, माझ्या लुकचे सर्वात महत्त्वाचा व अवघड भाग म्‍हणजे तिलक व शेवटचे म्‍हणजे विग. माझ्या पंखांचे वजन १४ किग्रॅ आहे आणि रिमोटद्वारे पंख नियंत्रित केले जातात. माझ्या लुमधील शेवटचा टप्‍पा म्‍हणजे आभूषणे, ज्‍यांचे वजन ७ किग्रॅ आहे. ही आभूषणे माझ्या लुकमध्‍ये आकर्षकतेची भर करतात. तसेच आकर्षक पंख व धोती देखील आहे. असे अवजड कॉस्‍च्युम व मेकअपसह अभिनय साकारणे आव्‍हानात्‍मक आहे. पण संपूर्ण प्रक्रिया अत्‍यंत लाभदायी ठरत आहे. मी मेकअप आर्टिस्‍ट्स, हेल्‍पर्स व कॉस्‍च्युम डिझायनर्सचे आभार मानतो. जे दररोज हा लूक अगदी सहजपणे डिझाईन करतात. या लूकमधून भूमिकेमधील नम्रपणा व भव्‍यता दिसून येण्‍यासोबत मालिकेची दैवी भव्‍यता दिसून येते. खरेतर, माझ्या चाहत्‍यांना हा लूक खूप आवडतो आणि त्‍याबाबत ते नेहमीच उत्‍सुक असतात..’’

Back to top button