Coconut water : नारळ पाणी नेहमीच फायदेशीर ठरत नाही! जाणून घ्‍या काय आहेत तोटे | पुढारी

Coconut water : नारळ पाणी नेहमीच फायदेशीर ठरत नाही! जाणून घ्‍या काय आहेत तोटे

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नारळ पाणी हे आरोग्‍यासाठी चांगले आहे. त्‍यामुळेi अशक्‍तपणा व आजारपणात नियमित नारळ पाणी पिण्‍याचा सल्‍ला दिला जातो. मात्र नारळ पाणी हे सर्वांसाठी लाभकारक असत नाही. ( Coconut water ) पोषण आणि चवदारपणा यामुळे नारळ पाणी सर्वांनाच गुणकारी वाटते; पण नारळ पाण्‍याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. जाणून घेवूया नारळ पाणी पिण्‍याचे काय आहेत तोटे या विषयी…

पोट फुगल्‍यासारखं वाटणं

अनेक जण डिहायड्रेशन कमी करण्‍यासाठी नारळी पाणी पितात. मात्र काही जणांना नारळ पाणी पिल्‍यानंतर पोट फुगल्‍यासारख वाटतं. कारण नारळ पाण्‍यात पोटॅशिअम १५ टक्के असते. त्‍यामुळे काही जणांना पोट गच्‍च झाल्‍यासारखं वाटतं. पोटॅशिअम अधिक असल्‍याने ह्‍दयाचे ठोके अनियमित होण्‍याचा धोका असतो. त्‍यामुळे ज्‍यांना हा त्रास होतो त्‍यांनी अल्‍प प्रमाणातच नारळ पाणी घ्‍यावे, असा सल्‍ला दिला जातो.

Coconut water : एलर्जी असेल तर टाळावे

काही जणंना नारळ पाणी घेतल्‍यानंतर त्रास होतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्‍नोलॉजी इन्‍फॉर्मेशनच्‍या वेबसाईटवर प्रकाशित एका संशोधनानुसार, काहींना नारळ पाण्‍याची एलर्जी असू शकते. मात्र यावर अद्‍याप सखोल संशोधनाची गरज आहे.

कॅलरीज वाढू शकतात

१०० ग्रॅम नारळ पाण्‍यात ७९ कॅलरी असतात. त्‍यामुळे नारळी पाणी पिल्‍यामुळे तत्‍काळ उर्जा मिळते. मात्र ज्‍यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक आहे त्‍यांच्‍या कॅलरीज नारळ पाण्‍यामुळे वाढू शकतात. त्‍यांनी तज्‍ज्ञांचा सल्‍ला घेवूनच नारळ पाण्‍याचे सेवन करावे

अधिक सेवनामुळे शरीरातील पोटॅशिअम वाढते

नारळ पाण्‍यात पोटॅशिअम अधिक प्रमाणात असते. त्‍याचे सेवन अधिक प्रमाणात केले तर शरीरातील पोटॅशिअमचा स्‍तर वाढतो. संशोधनात असे आढळले आहे की,वाढलेल्‍या पोटॅशिअममुळे शरीरास हानीकारक ठरते. त्‍यामुळे नारळ पाण्‍याचे अतिसेवन टाळणे हितकारक ठरते.

लो ब्‍लड प्रेळशच्‍या रुग्‍णांनी घ्‍यावी काळजी

उपाशी पोटी नारळ पाणी पिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब कमी होण्‍यास मदत होते. त्‍यामुळे ज्‍यांना लो ब्‍लड प्रेशरचा त्रास आहे त्‍यांना डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍यानेच नारळ पाण्‍याचे सेवन करावे, कारण कमी झालेला रक्‍तदाबही आरोग्‍य हानीकारक ठरतो.

हेही वाचा :

Back to top button