दोनशे कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला अटक

दोनशे कोटींच्या खंडणीप्रकरणी अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला अटक
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : दोनशे कोटींच्या खंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर याची पत्नी आणि अभिनेत्री लीना मारिया पॉल हिला अटक करण्यात आली आहे. लीना मारिया पॉल हिच्यावर दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कार्यवाही केली. .सुकेश चंद्रशेखर याला दोनशे कोटींच्या खंडणीप्रकरणी अटक करून तिहार जेलमध्ये पाठविण्यात आले होते. या दरम्यान त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर सुकेश यांची पत्नी लीना पॉलदेखील याप्रकरणात सहभागी असल्याचे निदर्शनास आले.

लीनाविरोधात सबळ पुरावे मिळाल्याने पोलिसांनी तिला अटक केली आहे. सध्या लीनाकडे पोलिस सखोल चौकशी करत आहेत. लीनाने तेलगू, तामिळ सिनेमांमध्ये काम केले आहे.

काय आहे हे प्रकरण?

एआयडीएमके (AIADMK) पक्षाचं निवडणूक चिन्ह देण्यासाठी आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी रेलिगेअर कंपनीचे प्रमोटर मलविंदर सिंह आणि शिविंदर सिंग या दोघांना अटक करण्यात आली होती.

याच दरम्यान सुकेश चंद्रशेखर आणि मलविंदर आणि शिविंदर यांची भेट घेवून यातून बाहेर काढण्याबाबत चर्चा केली.

यानंतर सुकेश जेलमधूनच मलविंदर आणि शिविंदर यांच्या पत्नीशी फोनवरून संपर्क साधला आणि दोघांना यातून जामिनावर सोडवण्यासाठी दोनशे कोटी रूपयांची मागणी केली.

सुकेश याने सिंह याच्या पत्नीना दोघांना जामिनावर सोडण्याची सोय करण्याचे आश्वासन दिले.

यानंतर मलविंदर सिंग यांच्या पत्नीकडून ३.५ कोटी रुपये, तर शिविंदरच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये उकळले.

हे पैसे हॉंगकॉंगमधील वेगवेगळ्या ठिकाणी बँके खात्यात जमा केले आहे.

काही दिवसांनी यातून आपले पती याप्रकरणातून बाहेर आले नसल्याने आपली फसवणुक झाल्याचे दोघींना समजले.

यानंतर सिंह बंधूंच्या पत्नींनी पोलिसांत धाव घेत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत.

सिंह बंधू ऑक्टोबर २०१९ पासून तिहार तुरुंगात असून त्यांच्या सुटकेचं अमिष दाखवून आपली फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेत सुकेशची पत्नी लिना हिचादेखील हात असल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news