Falguni Pathak : फाल्गुनीच्या गाण्याच्या रिमेकची वाट लावली, नेहा कक्कडवर टीका | पुढारी

Falguni Pathak : फाल्गुनीच्या गाण्याच्या रिमेकची वाट लावली, नेहा कक्कडवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायिका आणि अभिनेत्री नेहा कक्कड हिचं ‘ओ सजना’ गाणं रिलीज झालं. (Falguni Pathak) लोकप्रिय गायिका फाल्गुनी पाठकचे गाणे ‘मैंने पायल है छनकाई’चे रीमेक आहे. नेहा कक्कडचे हे गाणे ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्‍यक्‍त केला. त्याचबरोबर  गायिका फाल्गुनी पाठकनेदेखील सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. (Falguni Pathak)

नेहा कक्कडला कोणत्याही ओळखीची गरज नाही. ती बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिने आतापर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. तिची गाणी रिलीज होताच लोकप्रिय होतात. परंतु काहीवेळा ते लोकप्रिय होत नाही. उलट प्रेक्षकांकडून टीका सहन करावी लागते. यावेळीही असेच काहीसे घडले. नुकतेच ‘ओ सजना’ हे नवीन गाणे रिलीज झाले. फाल्गुनी पाठकने गायलेल्या ‘मैने पायल है छनकाई’ या ९० च्या दशकातील सुपरहिट गाण्याचे हे रिमेक व्हर्जन आहे. या गाण्यासाठी नेहावर सोशल मीडियावर टीका केली जात आहेत. फाल्गुनीनेही आपली खंत व्यक्त केली आहे. तिलाही तिच्या गाण्याचे हे व्हर्जन अजिबात आवडलेले नाही.

नेहा कक्कडचे ओ सजना हे गाणे १९ सप्टेंबर रोजी रिलीज झाले. या गाण्यामध्ये तिच्यासोबत क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि टीव्ही अभिनेता प्रियांक शर्मा यांना कास्ट करण्यात आले आहे. संगीत तनिष्क बागची यांचे आहे. जानी यांनी हे गीते लिहिली आहेत.

नेहा कक्कडने तिचे गाणे रिलीज करताच त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. एकाने लिहिले, ‘ओल्ड इज गोल्ड. फाल्गुनी पाठकची जागा कोणीही घेऊ शकत नाही. ती एक नगीना आहे. आणखी एका युजरने टीका करत कमेंट केलीय, ‘माझ्या कानातून रक्त येत आहे. किडनीला स्पर्शून जाणारे गाणे. आणखी एका युजरने ‘त्याच्या बालपणीच्या आठवणी उद्ध्वस्त करू नका’ अशी विनंतीही केली आहे. आता या कमेंट्स वाचल्यानंतर तुम्हाला हे नक्कीच समजले असेल की, नेहाचे हे गाणे रसिकांच्या पसंतीस उतरलेले नाही.

काय म्हणाली फाल्गुनी पाठक?

खरंतर फाल्गुनी पाठक काही बोलली नाही. तिने इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांच्या पोस्टचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये नेहा कक्कडला ट्रोल करण्यात आले आहे. फाल्गुनीचे कौतुक करण्यात आले आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘नेहा कक्कर, तू किती खाली जाऊ शकतेस? आमच्यासाठी आमचे जुने क्लासिक्स नष्ट करणे थांबव.’ अशा परिस्थितीत फाल्गुनी दोन कारणांसाठी अशा पोस्ट शेअर करत असल्याचे बोलले जात आहे. एकतर तिलाही नेहाचे हे गाणे आवडले नाही किंवा लोक तिची प्रशंसा करत आहेत, म्हणून ती पोस्ट शेअर करत आहे.

हे गाणे फाल्गुनी पाठकच्या १९९९ चा अल्बम ‘मैं पायल है छनकाई’ गाण्याचे शीर्षक ट्रॅक होते. हे गाणे ९० च्या दशकातील मुलांशी बालपणीच्या आठवणी जोडलेल्या आहेत. या गाण्याशिवाय फाल्गुनी पाठकने ‘चुडी जो खानकी हाथों में’, ‘मेरी चुनर उड उड जाये’, ‘ओ पिया’ आणि ‘अय्यो रामा’ सारखी सुपरहिट गाणी गायली आहेत.

हेही वाचा : 

Back to top button