सखे तुझं लाजणं : वैशाली माडे-जावेद अलींच्या सुरातील गाणं नवरात्रीत गाजणार | पुढारी

सखे तुझं लाजणं : वैशाली माडे-जावेद अलींच्या सुरातील गाणं नवरात्रीत गाजणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या रोमँटिक गाण्यांची चलती असताना यात भर घालत ‘विठ्ठला तूच’ चित्रपटातील ‘सखे तुझं लाजणं’ भेटीस आले आहे. हे रोमँटिक सॉंग रसिक प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. नवरात्रीचे औचित्य साधत हे रोमँटिक गाणे या नवरात्रीत थिरकायला लावण्यास सज्ज झाले आहे. नवरात्रीसाठी ठेका धरायला लावणारे बिट्स या ‘सखे तुझं लाजणं’ या गाण्यास देण्यात आले आहेत. यंदा नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत हे गाणे प्रेक्षकांना ठेका धरायला लावणार आहे.

‘वाय. जे. प्रॉडक्शन’ निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित ‘विठ्ठला तूच’ या चित्रपटातील हे गाणे आहे. हे गाणं अगदी रोमँटिक, प्रेमळ असं आहे, ज्यात प्रेमाच्या भावना आहेत. सुंदर असा डान्स आहे. जोडीला बॉलिवूडचा फिल देणारे व्हाईब्स आहेत. या गाण्याचे आणखी विशेष कारण असं की या गाण्यात नवोदित आणि चित्रपटाचा मुख्य नायक योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बिबे ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.

गायिका वैशाली माडे आणि प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी सुरबद्ध केले आहे. तर ‘सखे तुझं लाजणं’ या गाण्याला संगीत संगीतकार हर्षित अभिराज यांनी दिले आहे. कोरिओग्राफी योगेश जम्मा यांची आहे. या गाण्याचे बोल विनायक पवार यांनी शब्दबद्ध केले आहेत.

Back to top button