Leftovers Foods: उरलेल्या अन्नापासून बनवा झटपट आणि आरोग्यादायी नाष्टा

Leftovers Foods: उरलेल्या अन्नापासून बनवा झटपट आणि आरोग्यादायी नाष्टा

पुढारी ऑनलाईन: आपल्या देशात लाखो लोक उपाशी झोपताते; पण काही लोक हे घरातील, डब्यातील उरलेले पदार्थ सहजपण टाकून देतात. जेवण बनविण्याचे मॅनेजमेंट चुकल्याने किंवा अचानक घरातील मेंबर्स बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास अन्नाचा अपव्यय होऊ शकतो. त्यामुळे अन्नाचा अपव्यय टाळण्यासाठी शिळ्या, उरलेल्या अन्नपदार्थांचा (Leftovers Foods) पुन्हा वापर करून ते झटपट आरोग्यदायी बनविण्याच्या या आहेत काही  टिप्स…

उरलेल्या भाताचा मशरूम रिसोट्टो

एका पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करा. त्यामध्ये बारीक केलेला लसूण घालून, दोन मिनिटे तो शिजवा. पुढे यामध्ये चिरलेले मशरूम घाला आणि झाकण ठेवून ते मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर किसलेले चीज, तांदूळ, मीठ आणि काळी मिरी घाला. हे सर्व मिश्रण एकत्रित करून २ मिनिटे शिजवा, काही मिनिटातच रिसोट्टो (Leftovers Foods)  तयार होईल.

उरलेल्या चपातीचे व्हेजी रॅप्स

कढईत एक टीस्पून बटर घालून वितळू द्या. ते थोडं गरम झाल्यानंतर त्यात कापलेले टोमॅटो आणि कांदा घालून मंद आचेवर शिजवा. यामध्ये मीठ आणि मिरपूड, उभे चिरेलेले पनीर घाला. त्यानंतर पॅनमध्ये १ टीस्पून केचप सोबत १ टीस्पून हिरवी चटणी घाला. एक चीज स्लाईस किसून घ्या. हे तयार झालेले मिश्रण उरलेल्या चपातीत भरा, त्यानंतर हे हलकेसे टोस्ट करा (Leftovers Foods) आणि खाण्याची मज्जा घ्या.

उरलेल्या भाज्यांचे सँडविच

उरलेल्या (Leftovers Foods) भाज्या एका बाऊलमध्ये घ्या. त्या चांगल्या प्रकारे स्मॅश करा आणि बाजूला ठेवा. एका पॅनमध्ये, बटर टाका ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये उभा चिरलेला कांद तळून घ्या. त्यामध्ये स्मॅश केलेल्या भाज्या, 2 चमचे केचप, 1 किसलेले चीज क्यूब आणि थोडा चाट मसाला घाला. त्यानंतर यामध्ये भरपूर धणे पावडर किंवा 1 टीस्पून कोथिंबीर चटणी घाला. हे मिश्रिण चांगल्या प्रकारे मिसळा आणि सँडविच बनवून आणि ते ग्रील करा.

उरेल्या ब्रेडपासून गुलाबजामुन

ब्रेडच्या चारी बाजूच्या कडा काढून घ्या. एका बाऊलमध्ये ब्रेड, थोडी ताजी मलई आणि दूध घालून चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करा. त्यानंतर हे मिश्रण थोडा वेळ झाकून ठेवा. या तयार झालेल्या पीठाचे गोल गोळे बनवा. एका पॅनमध्ये हे गोळे तळता येतील, अशाप्रकारे तेल गरम करून घ्या. त्यानंतर थोडे थोडे गोळे तळून घ्या. दुसऱीकडे एक पॅनमध्ये एक कप पाणी आणि १ कप साखर उकळवा. पाकाचे हे मिश्रण चांगले सुसंगत करा. यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर घाला, त्यामध्ये तळलेले गोळे टाका आणि ते २ मिनिटे उकळवा. मस्त गुलाबजामुन खाण्यास रेडी होईल.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news