भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य | पुढारी

भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने २०२२-२३ साठी भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य पुरवणारी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, राज्य सरकारांना भांडवली गुंतवणूक प्रकल्पांसाठी ५० वर्षांच्या व्याजमुक्त कर्जाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य प्रदान केले जाईल.

योजनेच्या भाग ५ (ऑप्टिकल फायबर केबल) अंतर्गत, ३००० कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. आणि ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कवरील भांडवली प्रकल्पांसाठी ते राज्यांना उपलब्ध होतील. दूरसंचार विभागाच्या शिफारशीनुसार, व्यय विभागाने अलिकडेच उत्तराखंड (५० कोटी ), झारखंड (८४ कोटी), हरियाणा (६५ कोटी ) आणि कर्नाटक (१५६ कोटी ) या चार राज्यांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button