Ranbir Kapoor : रणबीर कपूरला भेटण्यासाठी ठाण्यात चाहत्यांची चेंगराचेंगरी

Ranbir Kapoor : रणबीर कपूरला भेटण्यासाठी ठाण्यात चाहत्यांची चेंगराचेंगरी
Published on
Updated on

ठाणे; पुढारी ऑनलाईन : ठाण्यातील विवियाना मॉल येथे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याने भेट दिली होती. यावेळी रणबीर कपूरला भेटण्यासाठी आणि त्याच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी त्याच्या चाहत्यांची एकच झुंबड उडाली. यावेळी इतकी गर्दी जमली होती की, रणबीर पर्यंत पोहचण्यासाठी धडपड करणाऱ्याचाहत्यांची चेंगराचेंगरी झाली आणि ते एकमेकांवर पडल्याने यावेळी एकच गोंधळ उडाला. यावेळी रणबीर कपूर सोबत 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी हे सुद्धा उपस्थित होते.

रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) ब्रह्मास्त्र चित्रपटाने संकटात असणाऱ्या बॉलिवूडला थोडासा दिलासा दिला आहे. बॉलिवूडकडे पाठ फिरवणारा प्रेक्षक रणबीर कपूरच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाला प्रतिसाद देत असून या चित्रपटाने चांगली कमाई सुद्धा केली आहे. दरम्यान या चित्रपटाला मिळणारा चांगला प्रतिसाद पाहता ब्रह्मास्त्र चित्रपटाची टीम अद्याप चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. याच प्रमोशनचा भाग म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी ठाणे येथील विवियाना मॉल येथे भेट दिली होती.

ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये अभिनेता रणबीर कपूर पोहचल्यावर त्यांच्या चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. त्यांच्या चाहत्यांनी त्याला मोठा गराडा घातला होता. या गराड्यात अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) हा सर्वांना भेटत होता. सर्वांशी बोलत आणि त्यांना शेकहँड करत होता. यावेळी अनेकजण त्याच्या जवळ पोहचून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होते. अत्यंत साधेपणाने आणि सर्व ग्लॅमर, व्हीआयपी प्रोटोकॉल सोडून रणबीर कपूर यावेळी चाहत्यांना भेटत होता.

दरम्यान, अत्यंत जवळ येऊन रणबीर कपूर सर्वांशी भेटतो म्हटल्यावर त्यांच्यासोबत हस्तांदोलन करण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड आणि चेंगराचेंगरी झाली. यावेळी या चेंगराचेंगरी वेळी अनेक चाहते एकमेकांवरच कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणालाच दुखापत झाली नाही. या घटनेनंतर रणबीर कपूरने आवाहन केले की, मी सर्वांना भेटतो फक्त तुम्ही गोंधळ आणि झटापट करु नका. यानंतर पुन्हा रणबीर कपूर चाहत्यांशी संवाद साधण्याचा त्याचा उपक्रम चालू ठेवला.

अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news