Lumpy skin disease : लंपी प्रतिबंधक मोफत लसीकरणास पशुपालकांचा अल्प प्रतिसाद; दूध ग्राहकांची संख्या घटली
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : देशामध्ये व महाराष्ट्रात लंपी रोगावर आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी प्रतिबंधक लस जनावरांना देण्यात येणार असल्याचे आवाहन करण्यात आले होते. पण, यावेळी बऱ्याच लोकांनी या लसीकरणाकडे पाठ फिरवली. तर, दुसरीकडे काही भागांमध्ये लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे दूध घेणाऱ्या ग्राहकांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे दिसते आहे. (Lumpy skin disease)
गेल्या महिन्यापासून राज्यात अनेक ठिकाणी लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. मराठवाड्यात पशुंना लंपीची प्रतिबंधक लस देण्यासाठी जनजागृती झाली नसल्याचे आढळून आले. त्यातच आखाडा बाळापूर येथे केवळ २०० जनावरांना लंपी प्रतिबंधक लस घेण्यासाठी आणण्यात आले होते. येथील गाई, म्हशी आणि बैल या जनावरांची संख्या हजारोच्या घरात आहे. पण, अवघ्या २०० जनावरांना लंपी लस देण्यात आली. एकीकडे लंपीचा जनावरात वाढता प्रभाव दिसत असून येत आहे. दुसरीकडे मात्र, पशुपालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Lumpy skin disease)
येत्या काळात याकडे दुर्लक्ष केल्यास लंपी रोगाची वाढ होण्याची शक्यता आहे. आखाडा बाळापूर परिसरात पशुपालकांनी लंपी आजाराचा धोका लक्षात घेऊन जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन आखाडा बाळापूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रणिता पेंडकर यांनी केले होते. त्याला अल्पसा प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा;