पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या आईचा खून केल्याप्रकरणी हॉलीवूड अभिनेता रायन ग्रॅँथम (Hollywood Actor Ryan Grantham) ला कोर्टाने १४ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रायनने नेटफ्लिक्समधील प्रसिद्ध शो रिवरडेलमधील भूमिकेमुळे लोकप्रियता मिळाली होती. आता तो २४ वर्षांचा आहे. सहा महिन्यांआधी त्याने कोर्टासमोर गुन्हा कबुल केला होता. यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या आदेशानुसार, रायन आता आपल्या आयुष्यात कधीच बंदुकीचा वापर करू शकत नाही. तसेच त्याला १४ वर्षांपर्यंत कुठलेही पॅरोल मिळणार नाही. (Hollywood Actor Ryan Grantham)
कॅनडातील वैंकूवर (Vancouver) येथील ब्रिटिश कोलंबिया सुप्रीम कोर्टाने Ryan Grantham ला शिक्षा ऐकवली. मार्च २०२० मध्ये रायनने आपल्या ६४ वर्षीय आईचा गोळ्या झाडून खून केला होता. त्याची आई बारबरा वेट पियानो वाजवत असताना रायनने तिच्यावर गोळी झाडली होती आणि तिचं निधन झालं. रिपोर्टनुसार, जस्टिस कॅथलीन केर यांनी कोर्टाचा निर्णय देत ही घटना खूप दु:खद, मन तोडणारी आणि आयुष्य उद्धवस्त करणारी आहे.
जूनमध्ये रायनच्या केसचे प्रोसिक्यूटरनी सांगितले होते की- अभिनेत्याच्या आईवर ३१ मार्च, २०२० रोजी गोळी झाडण्यात आली होती. त्याने या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला होता. या व्हिडिओमध्ये रायन आपली आई बारबरा वेट यांच्या मृतदेहाजवळ उभारून ही गोष्ट कबूल केली होती, त्याने आपल्या आईचा खून केला होता. व्हिडिओमध्ये तो म्हणतोय की, 'मी तिच्यावर मागून गोळी झाडली. नंतर तिला समजलं की, हे कृत्य मी केलं आहे.'