२००८ची आर्थिक मंदी वर्तवणाऱ्या ‘डॉ. डूम्स’नी दिला ‘हा’ भयंकर इशारा | पुढारी

२००८ची आर्थिक मंदी वर्तवणाऱ्या 'डॉ. डूम्स'नी दिला 'हा' भयंकर इशारा

२००८ची आर्थिक मंदी वर्तवणाऱ्या 'डॉ. डूम्स'नी दिला 'हा' भयंकर इशारा

पुढारी ऑनलाईन – २००८ची आर्थिक मंदी अचूक व्यक्त करणारे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ नौरेल रौबिनी यांनी अमेरिकेसह जगात मोठी आर्थिक मंदी येईल असा इशारा दिला आहे. ही मंदी भयावह आणि दीर्घ असेल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे S & P इंडेक्समध्ये फार मोठी करेक्शन येईल, तसेच ही मंदी २०२३च्या अखेरपर्यंत राहील असे भाकित त्यांनी व्यक्त केली आहे. (Nouriel Roubini predicts global recession)

S & P 500 हा अमेरिकेतील आघाडीच्या ५०० कंपन्यांचे शेअरचे भाव ट्रॅक करणारा इंडेक्स आहे. रौबिनी म्हणाले, “अगदी सामान्य अशा मंदीमध्ये हा निर्देशांक ३० टक्केंनी खाली येईल. पण प्रत्यक्षात हा निर्देशांक ४० टक्के इतका खाली येईल.”

२००८ची आर्थिक मंदी अचूक वर्तवल्याबद्दल डॉ. रौबिनी यांना डॉ. डूम असे नाव मिळाले आहे. जगातील कर्जाची स्थिती मार्केट खाली खेचेल, त्यामुळे आर्थिक विकासाचा वेग कमी आल्याशिवाय महागाईचा निर्देशांक २ टक्केवर आणणे फेडरल रिझर्व्हसाठी मिशन इम्पॉसिबल आहे. सध्याची महागाई, सेवाक्षेत्रातील चढे वेतन यामुळे फेडरल रिझर्व्ह पुढे व्याजदर वाढवण्यापलीकडे दुसरा काही पर्याय ही नाही, तसेच रशिया – युक्रेन युद्ध, महामारी, चीनमधील कोव्हिडसाठी असणारी झिरो टॉलरन्स पॉलिसी यामुळे विस्कळित झालेली पुरवठा साखळी यामुळे किंमती वाढतील आणि आर्थिक विकास खुंटलेला असेल. एकदा जग मंदीत सापडले तर सरकार फार मदत करू शकणार नाही, कारण जगभरातील सरकार आधीच कर्जाखाली आहेत. तसेच महागाई जास्त असताना आर्थिक पॅकेज दिले तर मागणीत अतिरिक्त भर पडते, असे विश्लेषण रौबिनी यांनी केले आहे.

“ही मंदी कमी कालावधीची आणि वरवरची नसेल. ती जास्त काळ टिकणारी, तीव्र आणि भयानक स्वरूपाची असेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button