Ira Khan: इराला बॉयफ्रेंडने सिनेस्टाईल केलं प्रपोज, किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Ira Khan: इराला बॉयफ्रेंडने सिनेस्टाईल केलं प्रपोज, किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खान (Ira Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने लाईमलाईटमध्ये असते. इरा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. आपले फोटोज, व्हिडिओज ती नेहमी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अपडेट करत असते. इरा आपल्या खासगी लाईफमुळे चर्चेत असते. इराने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शेखरसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो इराला सिनेस्टाईल प्रपोज करताना दिसत आहे. (Ira Khan)

इरा खानने लॉन्ग टाईम बॉयफ्रेंड नुपूर शेखरसोबत साखरपुडा केल्याचे म्हटले जात आहे. नुपूरने इराला खूपच रोमँटिक अंदाजात प्रपोज केलं आहे. त्याची झलक इराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलीय. इराने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला पाहून असे वाटत आहे की, तो कोणत्या तरी स्पोर्ट्स इवेंटमध्ये आहे. दरम्यान, नुपूर तेथे येतो आणि इराला सिनेस्टाईलमध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज करतो. जेव्हा इरा होकार देते, तेव्हा तिला अंगठी घालतो. यावेळचा दोघांचा किस करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

इरा आणि नुपुरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय. हा व्हिडिओ शेअर करताना इराने लिहिलंय, Popeye: She said yes 🥰❤️. Ira: Hehe☺️🤭😋 I said yes.

इराचा हा व्हिडिओ पाहून चाहतेच नव्हे तर सेलेब्सदेखील तिचे अभिनंदन करत आहेत. फातिमा सना शेख ने लिहिले, ‘आतापर्यंतची सर्वात प्रेमळ गोष्ट मी पाहिलीय. नुपूर किती फिल्मी आहेस.’ कृष्णा श्रॉफने लिहिलं, ‘क्यूटेस्ट थिंग एव्हर.’

इरा खान आणि नुपूर शेखर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. इरा अनेकदा नुपूरसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुपूर अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये इरासोबत दिसली. त्याचबरोबर इरा आणि नुपूर आमिर खानसोबत अनेकदा दिसल्या आहेत. नुपूर फिटनेस कोच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

Back to top button