Priya Bapat : प्रियाचं कॉटन साडीत मनमोहक हास्य अन्‌ ... | पुढारी

Priya Bapat : प्रियाचं कॉटन साडीत मनमोहक हास्य अन्‌ ...

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट (priya bapat) हिचे कॉटन रंगाच्या प्रिंटेड साडीत रुपडं खुललं आहे. तिच्या अनेक अदा वेगवेगळ्या फोटोंमधून पाहायला मिळतात. बिनधास्त आणि मदमस्त प्रिया नेहमीच आपले अपडेट्स चाहत्यांसाठी देत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत असते. तिचे काही व्हिडिओदेखील पाहायला मिळत असतात. आतादेखील निळ्या कॉटन प्रिंटेड साडीत प्रियाने सुंदर फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला आहे. (priya bapat)

प्रिया मोकळ्या केसांमध्ये खूप सुंदर दिसतेय. तिचं मनमोहक हास्य लक्ष वेधून घेणारं आहे. काळ्या रंगाच्या स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये तिची अदा आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. कानातील ईअरिंग्ज तिला शोभून दिसताहेत. एका झाडाजवळ उभी असलेली प्रिया खूप आकर्षक दिसतेय.

दोन आठवड्यांपूर्वी प्रिया बापट आणि तिचा पती, अभिनेता उमेश कामतने ओनम सण साजरा केला होता. यावेळी तिचा दाक्षिणात्य अन्न पदार्थांवर ताव मारतानाचा फोटो व्हायरल झाला होता. तिने फुलांपासून काढलेली सुंदर रांगोळीचा फोटोदेखील शेअर केला होता. प्रिया-उमेशचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

प्रिया जन्म १८ सप्टेंबर, १९८६ रोजी मुंबईत झाला होता. २०११ मध्ये तिने अभिनेता उमेश कामतशी लग्न केले. त्याआधी दोघे रिलेशनशिपमध्ये होते. कॉलेजमध्ये असताना प्रियाने प्रपोज केल्यानंतर उमेश कामतने तिला होकार देण्यासाठी खूप वाट बघायला लावली होती.

बिझनेस वूमन प्रिया 

प्रिया अभिनेत्रीच नाही तर बिझनेस वूमनदेखील आहे. तिने स्वत:चा साड्यांचा ब्रँड सुरू केला आहे, तिने आपल्या बहिणीसोबत साड्यांचा ब्रँड सुरु केलाय. प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या आगामी प्रोजेक्टची माहितीदेखील चाहत्यांना देत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

Back to top button