तुमची मुलगी काय करते? मालिकेत क्षिती जोगची एन्ट्री | पुढारी

तुमची मुलगी काय करते? मालिकेत क्षिती जोगची एन्ट्री

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील वेगळ्या धाटणीची अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे ‘तुमची मुलगी काय करते?’. चित्तथरारक अशा या ‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत असतात. त्यात भर घालत या मालिकेत रुईया कॉलेजमधून एकत्र नाटक, एकांकिका करत आज कलाविश्वात उत्तम अभिनेत्री असलेल्या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर या मालिकेदरम्यान पुन्हा एकत्र छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेची निर्माती आणि अभिनेत्री मनवा नाईक या मालिकेत असून मनवाच्या कॉलेजमधल्या जोडीदाराची आता एंट्री होणार आहे. हा निवळ योगायोग आहे. ‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत अभिनेत्री क्षिती जोगची एंट्री होणार आहे. क्षिती जोग या मालिकेत पोलीस इंस्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर एकत्र काम करण्याची मिळालेली संधी मनवा आणि क्षिती यांना पुन्हा एकदा त्यांच्या कॉलेजलाईफच्या फ्लॅशबॅकमध्ये नेईल यात शंकाच नाही. मनवाला तर आपण आधीपासूनच मालिकेत पाहतोय मात्र आता क्षितीला पोलिसाच्या भूमिकेत पाहणं रंजक ठरणार आहे.

Back to top button