पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री ईशा कोपीकर (HBD Isha Koppikar) आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. ईशा कोपीकरने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. पण त्यानंतर ती हिट होऊ शकली नाही. ईशा कोपीकरचा जन्म १९ सप्टेंबर, १९७६ रोजी माहीम, मुंबई येथे झाला. तिने आपले संपूर्ण शिक्षण मुंबईतून पूर्ण केले. फार कमी लोकांना माहीत असेल पण ईशा कोप्पीकर लाईफ सायन्समधून पदवीधर आहे. खरं तर, तिने तिच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली आणि फोटोशूटमधून प्रसिद्धीझोतात आल्यानंतर, ईशा कोप्पीकरने १९९५ मध्ये मिस इंडियामध्ये भाग घेतला, जिथे तिने मिस टॅलेंटचा किताब जिंकला. आज तिचा वाढदिवस, जाणून घ्या तिच्याबद्दल. (HBD Isha Koppikar)
१९९८ मध्ये तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. ईशाने 'चंद्रलेखा' या तमिळ चित्रपटातून पदार्पण केले आणि या चित्रपटानंतर तिने तामिळ, तेलगू, कन्नड आणि मराठी चित्रपटांमध्ये दीर्घकाळ काम केले. तिने बॉलिवूड डेब्यू 'फिजा' या चित्रपट केला होता. हा चित्रपट २००० रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तिच्यासोबत करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन यांनी काम केले होते. या चित्रपटानंतर ईशा प्रकाश झा यांच्या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसली आणि त्यानंतर तिने 'डरना मना है, कयामत, दिल का रिश्ता, पिंजर, मैने प्यार क्यूं किया, डॉन आणि कृष्णा कॉटेज इत्यादी' असे अनेक चित्रपट केले.
छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत अनेकदा कास्टिंग काउचसारख्या गोष्टी समोर येतात. 'खल्लास गर्ल' म्हणजेच अभिनेत्री ईशा कोपीकरलादेखील या गोष्टीला सामोरे जावे लागले आहे. तिने सांगितले की, हिरोने तिला फोनवरून एकटीला भेटण्यासाठी बोलावले होते. पण, तिने नकार दिल्याने तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, "ही गोष्ट २००० सालची आहे. एका प्रसिद्ध निर्मात्याने मला भेटायला बोलावले होते. त्यादरम्यान त्याने मला सांगितले की, तू नायकाच्या नजरेत चांगले असणे आवश्यक आहे, मी नाही. हा विषय काय आहे ते समजून घ्या. यानंतर मी हिरोला फोन केला. त्याने मला एकटीला येण्यास सांगितले आणि त्याने मला कोणत्याही स्टाफशिवाय एकटे येण्यास सांगितले. मला हे विचित्र वाटले की, मी निर्मात्याला फोन केला आणि सांगितले की, मी येथे आहे कारण माझ्यात टॅलेंट आहे आणि लुक्यमुळे आहे. मग काय मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवला.
ती पुढे म्हणाली, "यामुळे मी पूर्णपणे तुटले होते. मला वाटायचं की इथे तुमचं काम आणि तुमचं दिसणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एका अभिनेत्याच्या गुड बुक्समध्ये आहात की नाही हे पाहिलं जातं. अभिनेत्याच्या गुड बुक्सचा हाच अर्थ आहे. माझे आयुष्य माझ्यासाठी कामापेक्षा मोठे आहे. स्वतःला आरशात पाहिल्यानंतर मला आपल्याला स्वत:ला चांगलं वाटलं पाहिजे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर ईशाने टिमी नारंगसोबत लग्न केले. ईशा एका मुलीची आई आहे.