Virat Anushka : अनुष्का विराटला करत आहे मिस; म्‍हणाली “जग अधिक उजळ..” | पुढारी

Virat Anushka : अनुष्का विराटला करत आहे मिस; म्‍हणाली "जग अधिक उजळ.."

पुढारी ऑनलाईन डेस्क : विराट कोहलीसोबतचा फोटो त्‍याची पत्‍नी  अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फाेटाेची कॅप्शन पाहून अनुष्का विराटला खूप मिस करत असल्‍याचे स्‍पष्‍ट हाेत आहे. भारतीय  क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचे प्रेम कुणापासून लपलेले नाही. दोघेही वेळोवेळी एकमेकांना आपापल्या परीने आपुलकी दाखवत असतात. दरम्यान, विराट कोहलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना अनुष्का शर्माने त्याला प्रेमळ कॅप्शन लिहिले आहे. कॅप्शन पाहून अनुष्का विराटला खूप मिस करत असल्याचे दिसते. (Virat Anushka)

आशिया कपमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर विराट आणि अनुष्का युकेमध्ये सुट्टी घालवत होते. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मीत टी-20 सामन्यांची मालिका होणार असल्याने भारतीय संघातील खेळाडू संघात सहभागी होऊ लागले आहेत. मालिकेतील पहिला T20 सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. (Virat Anushka)

अनुष्‍का म्‍हणते…

फोटो शेअर करताना अनुष्का शर्माने लिहिले आहे की,  “जग अधिक उजळ, उजळ, आनंदी आणि अधिक चांगले बनते जेव्हा मला त्या सुंदर ठिकाणी मला बायो-बबलमध्ये तुमच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळते. मी तुम्हाला खूप मिस करत आहे. विराट कोहलीनेही यापोस्टला प्रतिक्रिया दिली असून, त्याने अनुष्कासाठी एक लव्ह इमोजीही शेअर केला आहे. दाेघांच्‍या चाहत्‍याकडून या फाेटाला पसंती मिळत आहे.

हेही वाचा;

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

Back to top button