मुंबई; पुढारी ऑनलाईन : थ्रीलर 'ए थर्सडे'मध्ये नेहा धूपिया पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, ती गर्भवती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. रॉनी स्क्रूवाला यांच्या आरएसवीपीने ब्लू मंकी फिल्म्ससोबत हा चित्रपट येतोय. डायरेक्ट-टू-डिजिटल थ्रिलर, 'ए थर्सडे'मधील नेहा धूपिया हिच्या लुकचे अनावरण झाले.
बेहजाद खंबाटाद्वारे लिखित हा चित्रपट आहे. हा चित्रपट 'ए थर्सडे' गुरुवारी घडणाऱ्या अकल्पनीय घटनांवर आधारित आहे.
नेहाने आपल्या सोशल मीडियावर आपला हा नवा लुक शेअर केला आहे. तिने म्हटलंय-
"Bridging the gap between real and reel life ? thank you @behzu @rsvpmovies @ronnie.screwvala @pashanjal @bluemonkey_film @hasanainhooda for giving me all the support and believing in us ? this ones for all the mamas in the making … we make us stronger ❤️ #ACPCatherineAlvarez #Athursday ? @ragininath12 @ayeshakhanna20"
प्रतिभाशाली अभिनेत्री नेहा एसीपी कैथरीन अल्वारेज नावाची भूमिका साकारतेय. ती गर्भवती असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तिची ही अनोखी व्यक्तिरेखा पाहण्यासारखी असेल.
चित्रपट एका प्ले-स्कूल शिक्षिकेच्या कहाणीवर आहे. जी १६ मुलांना बंधक बनवते. या थ्रीलरमध्ये यामी गौतम, डिंपल कपाड़िया, अतुल कुलकर्णी आणि माया सराओ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
'ए थर्सडे'ची निर्मिती आरएसवीपी मूवीज आणि ब्लू मंकी फिल्म्सद्वारे करण्यात येत आहे.
हेही वाचलं का?