Liger Flop : लायगर आपटला! विजय देवरकोंडा निर्मात्याचे ६ कोटी परत करणार | पुढारी

Liger Flop : लायगर आपटला! विजय देवरकोंडा निर्मात्याचे ६ कोटी परत करणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : लायगर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा विजय देवरकोंडा पुन्हा एकदा र्चेत आला आहे. अनेक हिट चित्रपट देणारा साऊथचा हिरो बॉलिवूडमध्ये मात्र फ्लॉप ठरला. त्याचा लायगर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. याचाच परिणाम म्हणून सूत्रांच्या माहितीनुसार, विजय देवरकोंडाने निर्मात्याचे लायगरसाठी घेतलेले ६ कोटींचे मानधन परत करण्याचा निर्णय घेतला आहे.

नेटकरी आधीपासूनच सोशल मीडियावर बायकॉटचा सूर लावत होते. बायकॉट बॉलिवूडचाही परिणाम लायगर या चित्रपटावर झालेला दिसतो. बिग बजेटमध्ये चित्रपट तर निघतात, पण ते पाहायला प्रेक्षक निरुत्सुक आहेत. अशावेळी अभिनेत्यांना आपल्या खिशातून भरपाई करावी लागते. याआधी आमिर खानने ‘लाल सिंह चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आपले मानधन सोडून दिले होते. आता विजय देवरकोंडाने ‘लायगर’ आपटल्यानंतर निर्मात्याला पैसे परत करण्याचा निर्णय घेतला.

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्टारर ‘लायगर’ २५ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचारही करण्यात आला. आशिया कप २०२२ च्या सामन्यादरम्यान देखील हा अभिनेता स्टेडियममध्ये दिसला होता.

बॉक्स ऑफिसवर चित्रपट आदळल्याने विजय देवरकोंडाने निर्मात्यांना ६ कोटींहून अधिकची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटासाठी तिने ३५ कोटी रुपये घेतले होते. आता तो यातील ६ कोटींहून अधिक रक्कम परत करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय सध्या ‘जन गण मन’ वर काम करत आहे, जो संपूर्ण भारतातही प्रदर्शित होईल. यासाठीही मोठे बजेट बनवण्यात आले होते, मात्र आता निर्मात्यांनी ते कमी केले आहे. कारण पुरी जगन्नाथ आणि विजय देवरकोंडा या दोघांनीही या चित्रपटासाठी आपले मानधन सोडले आहे. ते या चित्रपटासाठी विनामूल्य काम करताहेत.

Back to top button