Rinku Rajguru : रिंकूचा साजशृंगार पाहून आली देवसेनेची आठवण | पुढारी

Rinku Rajguru : रिंकूचा साजशृंगार पाहून आली देवसेनेची आठवण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सैराटची आर्ची अर्थातच रिंकू राजगुरू (Rinku) सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये काम केलंय. रिंकूचे दिवसेंदिवस होत असलेले ट्रान्सफॉऍर्मेशन पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. रिंकूने गणपती बाप्पांच्या आगमनावेळी सुंदर फोटोशूट केले होते. यावेळी ती ढोल वाजवतानाही दिसलीय. त्याचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. आता तिने डार्क पिंक कलरच्या साडीत फोटोशूट केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना ❤️❤️❤️ हार्ट इमोजी कमेंट करण्यास भाग पाडले आहे. (Rinku)

रिंकूने पिंक कलरच्या नऊवारीत खूप सुंदर फोटोशूट केला आहे. नाकात सुंदर नथ, साडीवर शोभतील असे दागिने, हातात कडे, कानात झुमके, केसांचा अंबाडा, त्यात फुले माळलेली दिसते. तसेच रिंकूने हातात सुंदर अंगठी घातलीय. एकापेक्षा एख पोज आणि मनमोहक लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पाडलाय. अनेकांनी तिला ❤️❤️❤️ हार्ट इमोजी देत तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

खुपच सुंदर ❤️🔥, So beautiful, ❤️❤️So beautiful ❤️❤️and so pretty ❤️❤️and ❤️❤️so nice picture ❤️❤️, Chehra h ya Chand Khila hain, So cute, देवसेना लुक्स😍👏🙌, Bhagamathi 😍If shivgami have a prequel.. the adventures of Shivgami.., God bless you be happy ❤️, Nice rinku 😍 अशा कमेंट्स चाहत्यांनी तिला दिल्या आहेत.

Back to top button