पिंपरी : स्पाईन रोडवर अवजड वाहनांची पार्किंग | पुढारी

पिंपरी : स्पाईन रोडवर अवजड वाहनांची पार्किंग

पिंपरी : स्पाईन रोडवर दुतर्फी अवजड वाहनांची पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. पिंपरी एमआयडीसी परिसरात वाहनांची सतत वर्दळ असते. त्यातच रस्त्यावरच दुतर्फी अवजड वाहनांची पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतुकीस मोठी अडचण येत आहे. पिंपरी एमआयडीसी भागात अनेक कंपन्या आहेत. त्यामळे या कंपन्यांतील वाहने स्पाईन रोडने जात असतात. यामध्ये अनेक कंपन्या रस्त्यावरच वाहने लावत असल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.

कर्मचार्‍यांची गैरसोय
या रस्त्यावर वाहनांची दररोज वर्दळ असते. त्यामुळे रस्त्यावर वाहने लावण्यास मनाई केली आहे. तरीही अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. अवजड वाहनांची पार्किंग लांब आहे. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरच वाहने लावत असल्याचे कंपनीतील कर्मचार्‍यांनी सांगितले.

Back to top button