केजीएफ चित्रपट पाहून सीरियल किलरनं केला ४ सुरक्षा रक्षकांचा डोके फोडून खून | पुढारी

केजीएफ चित्रपट पाहून सीरियल किलरनं केला ४ सुरक्षा रक्षकांचा डोके फोडून खून

पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील सिक्योरिटी गार्ड्सना मृत्यूच्या खाईत ढकलणाऱ्या सीरियल किलरला पोलिसांनी अटक केलीय. सायको किलरला राजधानी भोपाहून अटक केली आहे. माहितीनुसार, आरोपीने भोपाळमध्ये गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान रात्री हत्या केली. आरोपीला एटक करून सागर घेऊन जाण्यात आले. याप्रकरणी पोलिस तपास करत आहेत. सायकोकिलर बाहेर झोपणाऱ्या गार्ड्सची हत्या करता होता. त्याने हे कृत्य सुपरहिट चित्रपट केजीएफ पाहून हे खूप केल्याचे म्हटले जात आहे.

प्रसिद्ध होण्यासाठी करत होता खून

अटक झाल्यानंतर त्याने पोलिस टीमच्या एका सदस्याला सांगितलं की, त्याने केजीएफ चित्रपटाशी प्रेरित होऊन आणि प्रसिद्ध होण्यासाठी हे खून केले. त्याने आणखी काही ठिकाणी हत्या केल्याचे कबूल केले. या सायकोकिलरने सागरमध्ये चार गार्ड्सचे डोके फोडून हत्या केली होती.

सुरुवातीला तो मोबाईल चोरी आणि पैशांसाठी हत्या करायचा. तो मानोरुग्ण असल्याचे म्हटले जात आहे. या किलरने सागर जिल्हा आणि भोपाळमध्ये हत्या केल्या आहेत. आरोपीची ओळख CCTV ने पटली. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला पकडण्यात आले.

किलरने कबूल केले खून

पोलिसांनी सांगितलं कीस सुरुवातीच्या तपासात आरोपीने आपले नाव शिव प्रसाद सांगितले. आतापर्यंतच्या चौकशीत तो सहकार्य करत आहे. त्याने खून केल्याची गोष्ट कबूल केली. पोलिसांच्या माहितीनुसार, सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन आणि सार्वजनिक जागी चौकशी केल्यानंतर त्याचे लोकेशन भोपाळमध्ये दिसले. तिथे जाऊन सागर पोलिसांच्या टीमने त्याला अटक केली. हा किलर सागरच्या केसली थाना क्षेत्रातील एका गावाचा रहिवासी आहे.

पंधरा दिवस आधी भैंसामध्ये एका वर्क शॉपजवळ चौकीदाराची दगडाने ठेचून हत्या झाली होती. येथून चौकीदाराचा मोबाईल गायब होता. यानंतर मंगळवारी सिव्हिल लाईन ठाणे अंतर्गत आर्ट ॲण्ड कॉमर्स कॉलेजच्या आतदेखील एका चौकीदाराचा मृतदेह मिळाला. ज्याचे दगडाने ठेचून खून केल्याचे आढळले होते. या चौकीदाराचा मोबाईलदेखील गायब होता.

Back to top button