मुंबई; पुढारी ऑनलाईन: मोनिका खिलानी हिने पुण्यात 'क्लासिक हेरीटेज इंडिया' किताब जिंकला आहे.
शैक्षणिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात नुकतीच 'मिस हेरिटेज इंडिया' ही सौदर्यवतींची स्पर्धा थाटामाटात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन मृणाल एंन्टरटेंटमेंटच्या वतीने करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये भारतातील अनेक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता. मिस हेरिटेज इंडिया, मिसेस हेरिटेज इंडिया आणि क्लासिक हेरिटेज इंडिया अशा तीन भागात ही स्पर्धा पार पडली.
या स्पर्धेमध्ये 'क्लासिक हेरीटेज इंडिया' मोनिका खिलानी यांनी किताब पटकाविला. मोनिका खिलानी म्हणाली की, 'ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी आंतराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व मी लवकरच करणार आहे.'
यावेळी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेत्री हेमांगी कवी आदींनी मुकुट डोक्यावर घालून मोनिका खिलानी हिचे कौतुक केले.
या स्पर्धेत अनेक सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेसाठी नील ग्रुप कंपनीचे नील कांबळे यांची मोलाची साथ मिळाली. या स्पर्धेत परिक्षण निर्माती पूनम शेंडे, डॉ. गौरी चव्हाण, मयुरेश डहाके, आरती बलेरी यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन सिमरन आहुजा यांनी केले.
हेही वाचलं का?