एकदम कडक दिसतेस! सोनाली कुलकर्णी हिच्या साडीतील लूकवर चाहते फिदा | पुढारी

एकदम कडक दिसतेस! सोनाली कुलकर्णी हिच्या साडीतील लूकवर चाहते फिदा

पुढारी ऑनलाईन : एकदम कडक दिसतेस. अशी सुंदर कमेंट्स एका चाहत्याने सोनाली कुलकर्णी हिच्या फोटोवर दिली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीने नवे फोटो शेअर केले आहेत.

काही फोटोंमध्ये सोनाली ग्लॅमरस दिसतेय. इक कुड़ी जिहदा नाम मुहब्बत अशी कॅप्शन देत तिने काही फोटो शेअर केले आहेत.

अधिक वाचा –

सोनाली उत्तम अभिनय करते. पण, तिची अधिक चर्चा होते ती म्हणजे तिच्या सौंदर्याची. लग्न झाल्यानंतर सोनाली परदेशात गेली आहे. तिचा पती परदेशात नोकरी करतो.

अधिक वाचा –

तिच्या फोटोंना नेटकऱ्यांनी सुंदर कमेंट्स दिल्या आहेत. या कमेंट्समध्ये एका सोशल मीडिया युजरने लिहिलं आहे. ‘एकदम कडक दिसतेस.’ तर आणखी एका युजरने लिहिलयं, ‘लग्नानंतरदेखील तुझं सौंदर्य तसूभरदेखील कमी झालेलं नाही.’

सोनालीने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात सोनालीने खास पोलका डॉट असलेली साडी परिधान केली आहे. काळ्या रंगाची साडी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे पोलका डॉट नक्षी आहे.

अधिक वाचा –

साडीमध्ये सोनाली आणखी स्लिम आणि सुंदर दिसत आहे. त्यासोबत तिने छान इअररिंग्स आणि कंबरपट्टाही लावला आहे. सोनाली या फोटोत ग्‍लॅमरस दिसत आहे.

याआधीही सोनालीने खण साडीत एक फोटोशूट केलं होतं. सोनाली सोशल मीडियावर नेहमीच ॲक्‍टिव्‍ह असते. ती सातत्याने काही ना काही चाहत्यांसाठी शेअर करत असते.

सोनालीचा जन्‍म पुण्‍यात झाला. तिने मास कम्‍युनिकेशन आणि जर्नालिझममधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. पुण्‍याच्‍या एफटीआयआयमध्‍ये एका डॉक्‍युमेंट्रीवेळी तिने पहिल्‍यांदा कॅमेरा फेस केला.

तिच्‍या करिअरची सुरूवात डेली सोपमधून झाली. पण, ती झळकली ते चंदेरी पडद्‍यावर. ‘नटरंग’ या चित्रपटात ‘अप्‍सरा आली’ हे गाणे तिच्यावर चित्रीत करण्यात आले हहोते. पण, या गाण्‍याने तिला अधिक लोकप्रियता मिळवून दिली.

केदार शिंदे यांचा ‘बकूळा नामदेव घोटाळे’ यात तिची मुख्‍य भूमिका होती. तिला या भूमिकेसाठी उत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कारदेखील मिळाला.

सोनाली हिंदी कॉमेडी चित्रपट ‘ग्रॅण्‍ड मस्‍ती’मध्‍येही झळकली होती. तिने यामध्ये अभिनेता रितेश देशमुखच्‍या पत्‍नीची भूमिका केली होती. सुपरहिट चित्रपट ‘सिंघम’मध्‍येही तिचा कॅमियो रोल होता.

तमाशा चित्रपटामध्ये दिसणार

सोनालीचा तमाशा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर प्लॅनेट मराठी ओटीटीवर जारी करण्यात आला होता. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशियो फिल्म्सने सोशल मीडियावर तमाशा लाईव्हचे पोस्टर जारी केलं आहे.

संजय जाधव दिग्दर्शित या चित्रपटात सोनाली मुख्य भूमिकेत आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button