Rupali Bhosale : मराठमोळं देखणं रूप; रूपालीची नऊवारी लईचं भारी (Video) | पुढारी

Rupali Bhosale : मराठमोळं देखणं रूप; रूपालीची नऊवारी लईचं भारी (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजनाची भूमिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेतील संजनाची भूमिका मराठी अभिनेत्री रूपाली भोसलेने ( Rupali Bhosale ) उत्तम कौशल्याने साकारली आहे. रूपालीने मालिकेतील बूमिकेसाठी चाहत्याची वाहवा मिळविली आहे. याच दरम्यान तिचे नवनविन फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री रूपाली भोसलेने ( Rupali Bhosale ) तिच्या इन्स्टाग्राम एक हटके व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओत रूपाली मराठमोळा पारंपारिक नऊवारी साडीत हटके दिसतेय. यावेळी तिने पिवळ्या रंगाच्या पैठणीसोबत ब्लू रंगाच्या ब्लाऊज परिधान केलाय. केसांचा आबंडा, साजेशीर दागिने, मेकअप, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, कानात वेल आणि हातीतील हिरव्या बांगड्या तिच्या सौदर्यात भर घातली आहे. हा रूपालीचा लूकची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.

या व्हिडिओच्या बॅकग्राऊडला ‘धडकनों में तेरे गीत मिले है हुये, क्या कहू शर्म से लबं सिल्ले हूये… कबसे तू मेरी है कबसे मै तेरा हू लेला, ओ मेरी लेला…’ असे वाजत आहे. यासोबत रूपालीचा हा व्हिडिओत एका बागेत शूट करण्यात आला आहे. यात अनेक झाडे, हिरवे गवत, शोभेची झाडे आणि बागेत फेरफटका मारताना रूपाली दिसली आहे. पहिल्यांदा रूपाली बागेत पुढे- पुढे चालताना दिसतेय. तर मध्ये जावून एका शोभेच्या झाडाजवळ उभी राहून लाजताना आणि हासताना दिसतेय. तर गळ्यातील मोत्यांच्या दागिन्यांनी चारचॉद लावले आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘Dekha Ek Khwaab X Laila Kamaal Remix ❤️’. असे लिहिले आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर सेअर हाताच चाहत्यांनी भरभरून कौतुक केलं आहे. यात एका युजर्सने ‘Gorgeous 😍’, ‘अतिसुंदर मराठमोळी अदा हो गये हम फिदा👌’, ‘O meri Laila ❤️’, ‘Nice’, ‘Beautiful ❤️’, ‘Mast. 👌’, ‘always beautiful 😍’,’लुकमध्ये खूप सुंदर दिसतेस 👌👌❤️❤️’, ‘always gorgeous, Beautiful🔥❤️’, ‘Woov❤️’, ‘So pretty 😍’, ‘You look awesome 😍’, ‘Khup chan❤️’, ‘मनास साद घालणारी’, ‘Beautiful princess ❤️’, ‘Sunder’, ‘सुपरस्टार संजना’, ‘खूप सुंदर 🔥❤️’, यासारख्या कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आमि फायरचा ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओला आतापर्यत जवळपास १० हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहेत. यासोबत रूपाली भोसलेंचे हटके फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तिची ‘आई कुठे काय करते’ मालिका खूपच गाजत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button