हॉट सीट वर बसण्याच्या आनंदात स्पर्धकाने चक्क भर शोमध्ये उतरवला शर्ट

हॉट सीट वर बसण्याच्या आनंदात  स्पर्धकाने चक्क भर शोमध्ये उतरवला शर्ट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बी' होस्ट करत असलेल्या 'कौन बनेगा करोडपती' चा एक वेगळाच चाहता वर्ग आहे. क्वीज शो चा एक हटके आणि रंजक फॉर्मॅटने चाहत्यांना वेड लावलं. गेली 22 वर्षं आणि 14 सीझनच्या माध्यमातून या शो ने घराघरातील प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. अनेकांनी या शोच्या माध्यमातून प्रसिद्धी आणि धन दोन्ही मिळवलं आहे. अनेक सीझन आणि त्यासोबतच्या रंजक आठवणी या शोच्या इतिहासात आहेत. पण अलीकडेच असं काही घडलं की होस्ट अभिताभ यांच्यासह प्रेक्षकही चाट पडले.

गुरुवारी रिलीज झालेल्या या एपिसोडमध्ये एका स्पर्धकाने चक्क भर शोमध्ये शर्ट उतरवला. विजय गुप्ता असं या स्पर्धकाचं नाव आहे. 'फास्टेस्ट फिंगर्स फर्स्ट' या फेरीमधून विजय यांची स्पर्धेत पुढे खेळण्यासाठी निवड झाली. यावेळी विजय यांनी स्टेजवर येत अंगातील शर्ट काढला. हातात गोल फिरवत त्यांनी स्टेजला एक फेरी मारली.

प्रेक्षकात बसलेल्या आपल्या पत्नीला आलिंगन दिल्यानंतर विजय अमिताभ यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. आश्चर्यचकित झालेल्या अमिताभ यांनी 'सही है सर, सही है' असं म्हणत त्यांनी विजय यांनी शर्ट घालण्याची विनंती केली. पण इतक्यावर गप्प बसतील ते अमिताभ कसले ? ते पुढे म्हणतात, 'शर्ट लवकर घाला. मला भीती वाटते की आणखी काही कपडे ही उतरले जातील.' हे ऐकून प्रेक्षकही हसू लागले. अर्थात शर्ट उतरवून जोश दाखवल्यानंतरही विजय केवळ दहा हजारच जिंकू शकले. अमिताभ यांना सध्या कोविड पॉजिटिव असून आयासोलेशनमध्ये असल्याचं शेअर केलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news