The Trap Web Series : ‘द ट्रॅप’ वेब सीरीजच्या पोस्टरचे अनावरण | पुढारी

The Trap Web Series : 'द ट्रॅप' वेब सीरीजच्या पोस्टरचे अनावरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : थरारक आणि रहस्यमय कथेवर आधारित दिग्दर्शक रामकुमार शेडगे (the trap web series) यांच्या ‘द ट्रॅप’ या वेब सीरीजचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. शहरातील नाईटलाईफची संस्कृती मोठ्या प्रमाणात तरुणांना आकर्षित करत असून त्यात तरुणाईचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. या नाईटलाईफमध्ये पबिंग, पार्टी करणे आणि मस्ती करणे हा तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. नाईटलाईफ संस्कृतीच्या चक्रव्युहात एक तरुणी कशी अडकते? हे या वेब सीरिजमध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ही रोमांचकारी आणि रहस्यमय वेब सिरीज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (the trap web series )

‘द डार्क शॅडो मोशन पिक्चर्स’ निर्मित या वेब सीरिजमधून अभिनेत्री जानकी आर चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर रामकुमार शेडगे, आशुतोष भोसले, केतन पेंडसे, संदीप मोरे, अमोल भगत अशा अनेक कलाकारांचा अभिनय रसिकांना पाहायला मिळणार आहे. आकाश भापकर या कॅमेरामन असून लेखक-दिग्दर्शक रामकुमार शेडगे आहेत.

यापूर्वी रामकुमार शेडगे यांनी अबक या लोकप्रिय चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. त्यात सुनील शेट्टी आणि तमन्ना भाटियासारखे प्रसिद्ध कलाकार होते. या चित्रपटाला अनेक चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळाले. रामकुमार शेडगे यांनी द ट्रॅप या वेबसिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

Back to top button