akansha sharma
akansha sharma

akanksha sharma : आकांक्षाचं मादक फोटोशूट, दिशादेखील मागे पडली

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : डान्सर, अभिनेत्री आकांक्षा शर्मा (akanksha sharma ) सध्या अभिनेता टायगर श्रॉफमुळे चर्चेत आहे. टायगर आणि दिशा पटानीचा ब्रेकअप झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, टायगरचे नाव आकांक्षा शर्मा हिच्याशी जोडले जात आहे. आकांक्षा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे गायक बादशहासोबतचे प्यार में जैसे चमकू जुगनू हे गाणे अत्यंत लोकप्रिय ठरले आहे. या गाण्यातील तिच्या डान्स स्टेप आणि लूकदेखील चर्चेत होता. आता तिने नवे फोटो शूट केले आहे. ते पाहून तुम्हालाही वाटेल की, बोल्डनेसच्या बाबतीत तिने दिशा पटानीलादेखील मागे टाकले आहे. (akanksha sharma )

शिमर शॉर्ट ड्रेसमध्ये आकांक्षाने फोटोशूट केले आहे.  फिटनेसबाबतीत ती दिशासारखीच फिटनेस फ्रिक आहे. तिन हे फोटो शेअर करताना लिहिले आहे.-Sw?t like C?ndy.

कोण आहे आकांक्षा शर्मा?

आकांक्षा शर्मा व्यवसायाने मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तसेच ती उत्तम नृत्यांगनादेखील आहे. जिने २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'त्रिविक्रम' या चित्रपटाद्वारे करिअरची सुरुवात केली. आकांक्षाने तिच्या सुरुवातीच्या काळात साऊथ इंडस्ट्रीतील बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली आहे. साऊथ सुपरस्टार महेश बाबू, कीर्ती आणि बॉलिवूड अभिनेता वरुण धवन यांच्अ‍यासहनेक अभिनेत्यांसोबत  त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय ती बादशाहच्या हिट म्युझिक व्हिडिओ 'जुगनू'मध्येही दिसली होती.

टायगर श्रॉफ आणि आकांक्षा शर्मा यांनी म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पहिल्या म्युझिक व्हिडिओचे नाव 'कॅसानोव्हा' आणि दुसऱ्याचे नाव 'आय एम अ डिस्को डान्सर २.०' अशी नावे आहेत. या दोन्ही गाण्यांमध्ये टायगरची आकांक्षासोबतची केमिस्ट्री जबरदस्त होती. असा दावा केला जात आहे की, या दोन गाण्यांच्या शूटिंगदरम्यान टायगर आणि आकांक्षा एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली, अशी बाॅलीवूडमध्‍ये चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news