Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन-सैफचा 'विक्रम वेधा'चा टीझर पहा | पुढारी

Vikram Vedha Teaser: हृतिक रोशन-सैफचा 'विक्रम वेधा'चा टीझर पहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांगलं आणि वाईट यांच्यातील वॉर दाखवणाऱ्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha Teaser) चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. हा चित्रपट विक्रम वेधा या सुपरहिट तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. तमिळ चित्रपटात आर. माधवन आणि विजय सेतुपती महत्त्वाच्या भूमिकेत होते. आता हिंदी ‘विक्रम वेधा’मध्ये हृतिक रोशन आणि सैफ अली खान एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. ‘अग्निपथ’ नंतर हृतिक रोशनला या लूकमध्ये पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. हा चित्रपट ३० सप्टेंबर, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (Vikram Vedha Teaser)

हिंदीतील ‘विक्रम वेधा’ ची कथा

पुष्कर आणि गायत्रीच्या चित्रपटाच्या टीझरमध्ये दोन मोठे स्टार्स दाखवण्यात आले आहेत. चित्रपटाचे संवाद तमिळ ‘विक्रम वेधा’ वरून प्रेरित वाटतात. तमिळ ‘विक्रम वेधा’चे भीतीदायक पार्श्वसंगीतही चित्रपटात वापरण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये हृतिकला गँगस्टर ठरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसरीकडे, सैफ अली खान ‘सेक्रेड गेम्स’चा सुपर कॉप फील देत आहे.

तमिळ ‘विक्रम वेधा’देखील त्याच्या संवादांमुळे लोकप्रिय झाला. तर हिंदी ‘विक्रम वेध’ संवाददेखील जोरदार हिट आहेत. पावणे दोन सेकंदाचा टीझर तुम्हाला नक्कीच वेड लावेल.

पुष्कर आणि गायत्रीचा हा चित्रपट अॅक्शन आणि थ्रीलने परिपूर्ण आहे. जबरदस्त संवादांशिवाय कलाकारांचा नवा लूक खूपच औत्सुक्यपूर्ण आहे. तमिळ ‘विक्रम वेधा’ २०१७ मध्ये पडद्यावर आला होता. हिंदी चित्रपट ३० सप्टेंबर, २०२२ रोजी रिलीज होणार आहे.

हेदेखील वाचा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

Back to top button