

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड ब्यूटी सारा अली खानचे बोल्ड फोटो सध्या चर्चेत आहे. (Sara Ali Khan) विशेष म्हणजे ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. लेटेस्ट पोस्टमध्ये, अभिनेत्री साराने देसी लूकमध्ये ग्लॅमरचा तडका लावला आहे. साराचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Sara Khan)
सारा अली खान नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सारा अली खान डीप नेक ब्लाऊज आणि गोल्डन रंगाचा लहंगा असा पेहराव केला आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे. सारा अली खान गोल्डन लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने ऑफ शोल्डर ब्लाउजसह फ्लोरल डिझाईनचा लेहेंगा परिधान केला आहे. तिने केस सोडले आहेत. तिने ज्वेलरी घातली नसली तरी तिचा कम्प्लिट लूक पाहायला मिळत आहे.
सारा अली खानने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक खास स्थान निर्माण केले आहे. अभिनेत्री साराने तिच्या स्टाईल स्टेटमेंटने इंडस्ट्रीत एक वेगळा ट्रेंड सेट केलाय.
नुकताच ती तिची मैत्रीण जान्हवी कपूरसोबत कॉफी विथ करण शोमध्ये सहभागी झाली होती. सारा अली खान लवकरच एका महत्वाच्या चित्रपटात दिसणार आहे. ती पहिल्यांदाच रिअल लाईफ भूमिका साकारताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा चित्रपट 'ऐ वतन मेरे वतन' मध्ये फ्रीडम फायटर उषा मेहताच्या भूमिकेत असेल.