जिया खानचा मृत्यू आजही न सुटलेलं कोडं 

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

अभिनेत्री जिया खानचा आज २० फेब्रुवारीला जन्मदिवस आहे. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं; सक्सेस, फेम, ग्लॅमर मिळवलं. पण, कुणालाही वाटलं नव्हतं की, ती इतक्या लवकर जग सोडून जाईल. पण, जियाचं दु:ख जगापासून लपून राहिलं होतं. त्या दु:खातून ती बाहेर आली नाही. ३ जून, २०१३ रोजी तिने अवघ्या २५ व्या वर्षी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आपल्या छोट्याशा करिअरमध्ये जिया खानने कमी कालावधीच प्रसिध्दी मिळवली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत डेब्यू करणाऱ्या जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यू-यॉर्कमध्ये झाला होता. न्यू-यॉर्कमध्ये न राहता जियाने आपली पावले सातासमुद्रापार भारतात बॉलिवूडकडे वळवली. तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. 

जिया खानला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक २००७ मध्ये मिळाला होता. तिला राम गोपाल वर्माच्या 'निशब्द' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यूसाठी ती नॉमिनेट झाली होती. 

अमिताभ बच्चन यांच्यानंतर तिला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. २००८ चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी'मध्ये तिने आमिरसोबत काम केले. त्यानंतर जिया खानने कॉमेडी जॉनरमध्ये पाऊल ठेवलं. दिग्दर्शक साजिद खानचा चित्रपट हाउसफुलमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकली. अभिनयाशिवाय, जिया ट्रेन्ड सिंगर आणि डान्सरदेखील होती. जियाने बालपणापासून उर्मिलाची फॅन होती. 'दिल से' मध्ये जियाने बाल कलाकाराची भूमिका केली होती. 

जियाचा मृत्‍यू न सुटलेले कोडं 

जिया खानने वयाच्या २५ व्या वर्षी आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृत्‍यू आजदेखील न सुटलेले कोडं आहे. आत्‍महत्‍येपूर्वी जियाने चिठ्‍ठी लिहिली होती. त्‍यामध्‍ये तिने अनेक मोठे खुलासे केले होते. जिया खानने २०१३ मध्‍ये आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृतदेह तिच्‍या मुंबईतील जुहू स्थित घरात आढळला होता. 

आत्महत्येपूर्वी आईशी फोनवर बोलली…

३ जून, २०१३ रोजी रात्री ९ वाजून ३७ मिनिटांनी तिने आपल्‍या आईसोबत फोनवर बातचीत केली होती. जियाच्‍या आईने तिला म्‍हटले होते की, काहीतरी खा. खूप बारीक दिसत आहे. नंतर ११ वाजून २० मिनिटांनी तिची आई राबिया घरी पोहोचल्‍या. त्यावेळी जिया खानचा मृतदेह पंख्‍याला लटकलेला आढळला होता. 

जिया खानचं ६ पानांचं पत्र 

जिया खानच्‍या मृत्‍यूनंतर एका आठवड्‍यांनी तिची बहीण कविताला सहा पानी पत्र मिळाले होते. हे पत्र जियाने लिहिले होते. ही नोट सूरज पंचोलीसाठी होतं. यामध्ये सूरज पंचोलीसोबत रिलेशनशीपमध्ये राहत अशताना तिला ज्या प्रकारे त्रासाला सामोरं जावं लागलं होतं, ते सर्व तिने लिहिलं होतं. त्यामुळे आजदेखील सूरज पंचोलीला चौकशीला सामोरं जावं लागतयं. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला निर्देश दिलं की, जिया प्रकरणाचा तपास खोल तपास करावा. तेव्हापासून हे प्रकरण कोर्टात आहे. 

सूत्रांच्‍या माहितीनुसार, जियाने पत्रात लिहिले होते- 'तुझ्‍या आयुष्‍यात महिला आणि पार्टीज आहेत. मी हर्ट झाले. मी माझं बाळ गमावलं. तू माझं ख्रिसमस खराब केलं आणि माझं बर्थडे डिनरदेखील. व्‍हॅलेंटाईन डेलादेखील तू माझ्‍यापासून दूर राहिलास. तू मला वचन दिलं होतं की, एका वर्षाच्‍या आत तू माझ्‍याशी लग्‍न करशील. मला माहिती नाही की, मी या सर्व गोष्‍टी तुला कशा सांगू. परंतु, आता माझ्‍याकडे काही उरलेलं नाही. मी माझं सर्व काही गमावलं. जर तू हे वाचत असशील तर, त्‍यावेळी मी या जगात नसेन. मी आतून तुटले. मी तुझ्यावर प्रेम केलं. तरीही तू मला रोज टॉर्चर केलंस. आता श्‍वास घेण्‍यासाठी माझ्‍याकडे कुठलेही कारण नाही. मला केवळ प्रेम हवं होतं. मी तुझ्‍यासाठी सर्वकाही केलं. मी आपल्‍या दोघांसाठी काम करत होते. माझं भविष्य उद्‍ध्‍वस्‍त झालं. माझा आनंद तू हिरावून घेतलास. तू कधी माझं प्रेम पाहिलचं नाहीस. माझं सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडेन्स उरलाच नाही. माझे जेदेखील टॅलेंट, महत्वाकांक्षा होत्‍या, त्‍या सर्व तू हिरावून घेतल्‍यास. माझं आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त केलंस. 

जिया खानने जून २०१३ ला आत्‍महत्‍या केली होती. या प्रकरणी जियाचा तथाकथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला अटक झाली होती. जिया आणि सूरज लिव्‍ह इन रिलेशनमध्‍ये होते, असे म्‍हटले गेले. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्‍यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जियाला सूरजने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते. सीबीआयने सूरजला ताब्‍यात घेऊन चौकशीही केली होती. सूरजने पॉलीग्राफी आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्‍यास नकार दिला होता. सूरजला जामीन मिळाला होता. जेलमधून बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगितले होते की, जिया करिअरविषयी डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनी तिची साथ सोडली होती. ती प्रत्येक छोट्या गोष्टींवरून फोन करायची, खूपच पझेसिव्ह होती. जियाच्या आत्महत्या प्रकरणी सूरजने नेहमीच स्वत: निर्दोष असल्याचे म्हटले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news