Karthikeya 2 : पुष्पानंतर का होतेय ‘कार्तिकेय २’ चर्चा…’फायर है ये’

Karthikeya 2
Karthikeya 2
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लाल सिंह चड्ढा आणि रक्षाबंधनच्या गोंधळादरम्यान, तेलुगु चित्रपट कार्तिकेय 2 (Karthikeya 2) ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाचा वाढता परफॉर्मन्स पाहता बॉक्स ऑफिसच्या कलेक्शनी चर्चा होतेय. रक्षाबंधनच्या औचित्याने बॉलीवूडचे दो मोठे चित्रपट 'रक्षाबंधन' आणि 'लाल सिंह चड्ढा' क्लॅश झाले. आमिर खान आणि अक्षय कुमार सारखे सुपरस्टार असल्याने या चित्रपटांची चर्चा झाली. पण, हे चित्रपट म्हणावे तसे चालले नाहीत. बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षय कुमारचा 'रक्षाबंधन' बायकॉट होत आहे. या दोन्ही चित्रपटांदरम्यान, एक तेलुगु चित्रपटदेखील रिलीज झाला. या चित्रपटाचे नाव आहे-'कार्तिकेय 2'. या प्रादेशिक चित्रपटाची सुरवातीला फार चर्चा झाली नाही. पण हळूहळू कार्तिकेय २ ने असा कमाल केला की, दोन्ही धुरंधर स्टार्सवर हा चित्रपट भारी पडला. कार्तिकेय २ ची तुलना प्रेक्षक पुष्पा चित्रपटाशी करू लागले. (Karthikeya 2)

सोशल मीडियाच्या प्रेक्षकांनी याला अल्लू अर्जुनच्या पुष्पासारखे फायर आहे म्हटले. 'कार्तिकेय' १३ ऑगस्ट, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अवघ्या ४-५ कोटींच्या छोट्या बजेटमध्ये ते पूर्ण झाले. आजकाल मेगा-बजेटचे चित्रपट बनणे कॉमन झाले आहे, पण जेव्हा एखादा चित्रपट कमी खर्चात बनवला जातो, तेव्हा त्याची चर्चा एवढी वेगाने होते की, तो चित्रपट नक्कीच काहीतरी खास आहे.

'कार्तिकेय २' हा २०१४ मध्ये आलेल्या 'कार्तिकेय' चित्रपटाचा सिक्वेल आहे. निखिल सिद्धार्थ, अनुपमा आणि अनुपम खेर हे त्याचे प्रमुख कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अभिषेक अग्रवाल यांनी केली आहे. २०१७ मध्ये घोषित झालेला 'कार्तिकेय २' हा एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट आहे.

'कार्तिकेय २' ची कथा कार्तिकेयाभोवती फिरते. तो एक वैद्यकीय विद्यार्थी आहे, ज्याला एका मंदिराची माहिती मिळते. जिथे प्रत्येक पाहुण्यांचा साप चावल्यामुळे मृत्यू होतो. आता कार्तिकेय या प्रकरणाचा शोध घेऊ लागला की यामागचे कारण काय आहे. मंदिरात खरच काही गुपित दडलेले आहे की आणखी काही प्रकरण आहे.

'कार्तिकेय २' ची कथा

'कार्तिकेय'चा सीक्वल आठ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर आला आहे. यावेळी पुन्हा कथा कार्तिकेयाभोवती फिरते. पण यावेळी कार्तिकेय अभ्यास करत नसून डॉक्टर झाला आहे. एके दिवशी कार्तिकेय आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी द्वारकेला पोहोचतो. येथे त्याला अशा एका खुनाची माहिती मिळते, ज्याबद्दल त्याच्या संवेदना उडाल्या आहेत. मग तो त्याचे गूढ उकलण्यास सुरुवात करतो.

कार्तिकेय २ ची चर्चा का होत आहे?

'कार्तिकेय २' त्याच्या कलेक्शनमुळे चर्चेत आहे. याने केवळ दक्षिणेतच नाही तर हिंदीतही चांगला व्यवसाय केला आहे. एकीकडे १८० कोटींमध्ये बनलेला लाल सिंग चड्ढा निराश झाला. तर दुसरीकडे ८० कोटींच्या रक्षाबंधनानेही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरम्यान, 'कार्तिकेय २' हा छोट्या बजेटचा चित्रपट चांगलाच परफॉर्मन्स करताना दिसला. पहिल्या दिवशी 'कार्तिकेय २' ने ५ कोटी तर दुसऱ्या दिवशी ५.७९ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आतापर्यंत ६ दिवसांत 'कार्तिकेय २' ने भारतात २७ कोटींची कमाई करून व्यावसायिक नफ्याच्या बाबतीत वर्चस्व गाजवले आहे.

'कार्तिकेय २' चे आतापर्यंतचे कलेक्शन –

पहिला दिवस- ५.४ कोटी रुपये
दुसरा दिवस- ५.७९ कोटी रुपये
तिसरा दिवस-७.२० कोटी रुपये
चौथा दिवस- ३.७८ कोटी रुपये
पाचवा दिन- ३.२४३ कोटी रुपये
सहावा दिवस- जवळपास २.७० कोटी (अनुमान)
एकूण कलेक्शन- २७.८३ कोटी रुपये

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news