दीड महिन्यापूर्वीच आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय दहिहंडी फोडली : मुख्यमंत्री | पुढारी

दीड महिन्यापूर्वीच आम्ही ५० थर लावून सर्वात मोठी राजकीय दहिहंडी फोडली : मुख्यमंत्री

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : गोविंदा थर लावून हंडी फोडतात. मात्र, आम्ही 50 थर लावून सर्वात मोठी राजकीय हंडी फोडली, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. बाळासाहेव आणि आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले.  असेच थर यापुढे वाढत जातील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. यापुढे उत्सव जोरात साजरे करा, पण काळजी घेऊन करा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका उत्सवात जोरदार टोलेबाजी केली. स्टेजवर येताच यावेळचा गोविंदा जोरात आहे ना? अशी साद त्यांनी गोविंदाला घातली. शिंदे पुढे म्हणाले की, गोविंदाचा विमा पण दिला. सरनाईक आणि लोकप्रतिनिधींनी खेळाच्या दर्जाची मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली आहे. महाराष्ट्र गोविंदाचाही आहे. अपघात होऊ नये, याची काळजी घ्या. प्रो कबड्डीप्रमाणे पुढच्या वर्षी प्रो गोविंदा होईल. आणि गोविंदांना नोकरीत 5 टक्के आरक्षण मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टेंभी म्हणजे गोविंदाशी पांढरी वाहे आहे. कपूर नाव असले तरी त्यांनी मराठीत भाषण केले. आनंद दिघे यांनी सुरू केलेला उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. धर्म आणि संस्कृती जोपासण्याचे काम दिघे यांनी केले. आनंद दिघे यांचे ठाण्याचा मुख्यमंत्री झालो पाहिजे. असे स्वप्न होते. त्यांच्या भगिनीनेही  हेच सांगितले होते. त्यांची एवढी दूरदृष्टी होती. आणि दिघे यांचे स्वप्न आज पूर्ण केले आहे. असे सांगून ते म्हणाले की, सर्वसामान्यांचे सरकार आहे. उत्सव काळजी घेऊन साजरे करा. साथीचे आजार अजून गेलेले नाहीत. काळजी घ्या. गणपती उत्सव देखील मोठया उत्साहात साजरा झाला पाहिजे.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने साधला मराठीत संवाद..

टेंभी नाका दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरने हजेरी लावली. विशेष म्हणजे श्रद्धा कपूरने या उत्सवात गोविंंदांशी संपूर्ण मराठीत संवाद साधला. टेंभी नाक्याची दिघे साहेबांची दहीहंडी ही सर्वात मोठी आणि मनाची हंडी असल्याचे सांगत मला या उत्सवात बोलावल्याने माझे भाग्यच आहे. या उत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थिती लावल्याने आपल्यासोबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने याचा विशेष आनंद असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button