कोल्हापूर : श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात तिरंगी पूजा | पुढारी

कोल्हापूर : श्री चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिरात तिरंगी पूजा

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : कुरूंदवाड येथे 113 वर्ष पुर्ण झालेले श्री. चिंतामणी पार्श्वनाथजी जैन श्वेतांबर मंदिर आहे. येथे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घंटा- नाद वाजवून शहरात संदेश देण्यात आला होता. यानिमित्य आज मंदिरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनाच्या पार्श्वभूमीवर भगवान श्री चिंतामणी यांच्या मूर्तीला तिरंगी वस्त्रालंकाराचे रूप देऊन सजावट करण्यात आली.    महिलांनी तिरंगी रांगोळी काढून अमृतमहोत्सवी 75 दिव्याची आरस पूजा करून मंदिरावर तिरंगा वस्त्राने सजावट केली. दरम्यान, आध्यात्मिकतेला आज भारतीय स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षाची किनार मिळाली.

कुरुंदवाड येथील बाजारपेठेत सन १९०९ साली समस्त श्वेतांबर जैन समाजाने श्री. चिंतामणी मंदिराची उभारणी केली. त्यावेळी अनेक क्रांतिकारी या मंदिरात येऊन गेले आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वात प्रथम मंदिरात घंटा- नाद वाजवून संदेश देण्यात आला होता. यानिमित्त श्री. चिंतामणी मूर्तीला तिरंगी लोकर वस्त्राची सजावट करून तिरंगी रांगोळी काढण्यात आली. तसेच 75 दिवे प्रज्वलित करून दिव्यांचा 75 आकडा तयार केला आहे. मंदिराच्या द्वारावरही तिरंगी वस्त्राची सजावट करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मंदिर परिसर तिरंगी आणि देश भक्तीने उजळून निघाला आहे.

या मंदिर सजावटीस  रोपण शहा, वृषभ शहा, सन्मेश व्होरा,ब्रिजेश व्होरा,यश व्होरा,जित व्होरा,अक्षय शहा,जयेश शहा,आकाश व्होरा,पवन शहा,पार्थ शहा व महिलांनी मोठ्या संख्येने  सहभाग घेतला होता.

 

हेही वाचलंत का?

Back to top button