गौरव दीक्षित याला ड्रग्सप्रकरणी मुंबईतून अटक | पुढारी

गौरव दीक्षित याला ड्रग्सप्रकरणी मुंबईतून अटक

मुंबई; पुढारी ऑनलाईन: टिव्ही अभिनेता गौरव दीक्षित याला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी मुंबईत एनसीबीने (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) अटक केली. गौरव दीक्षित घरावर एनसीबीकडून छापा टाकण्यात आला. या छाप्यात एमडी ड्रग्स, चरस आणि इतर ड्रग्स जप्त करण्यात आले. अभिनेता एजाज खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीच्या आधारे गौरवला अटक करण्यात आली आहे.

ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर चौकशीदरम्यान अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. शादाब हा मुंबईतील सर्वांत मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा असून त्याने बॉलिवूड स्टार्संना मागणीवरून ड्रग्ज पुरवित असल्याची माहिती समोर आली होती.

या माहितीच्या आधारे चौकशी केली असता अभिनेता एजाजचे नाव पुढे आले होते. एप्रिल महिन्यात मुंबई विमानतळावरून एजाजला एनसीबी पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे एनसीबी चौकशी केली आहे.

याचदरम्यान एनसीबीने गौरव दीक्षितच्या मुंबईतील लोखंडवाला येथील घरात छापा टाकला होता. या छाप्यात गौरवच्या घरी अंमली पदार्थ सापडले होते. परंतु, यानंतर गौरव दीक्षित फरारी झाला होता. तेव्हापासून एनसीबीचे पथक त्याचा शोध घेत होते. अखेर आज मुंबईतून एनसीबी पथकाने गौरव दीक्षितला अटक केली.

गौरवने अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. ‘हॅपी भाग जाएगी’, ‘हॅपी फिर भाग जाएगी’ यांसारख्या चित्रपटात त्याने दमदार मुख्य भूमिका साकारली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button