टोईंग व्हॅनने बाईकसह उचललेल्या उमेश वाळेकर यांना मिळाला न्याय | पुढारी

टोईंग व्हॅनने बाईकसह उचललेल्या उमेश वाळेकर यांना मिळाला न्याय

पुणे; पुढारी वृत्तसेवा: वाहतूक पोलिसांनी टोईंग व्हॅनने बाईकसह उचललेल्या उमेश वाळेकर यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. उमेश वाळेकर याने दै. ‘पुढारी’चे आभार मानले आहेत.

टोईंग व्हॅनने बाईकसह उचलेला उमेश वाळेकर यांनी धन्यवाद पुढारी, खरं आणि पार पक्व काम करणारे पुढारी वृत्तपत्र आहे. नाना पेठेत घडलेली सत्यस्थिती आणि सत्याच्या मागे तुम्ही उभे राहिलात. माझ्यासारख्या तरूणाला तुम्ही न्याय मिळवून दिलात. त्याबद्दल दै.‘पुढारी’चे खूप- खूप धन्यवाद देवून आभार मानत तो गहिवरला.

गेल्या आठवड्यात दि. २० ऑगस्ट रोजी दै. ‘पुढारी’ ने ‘वाहतूक पोलिसांच्या तालीबानी कारभार’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली होती. या घटनेनंतर एका तरूणाला त्याच्या मोटारसायकलसह टोईंग व्हॅनने उचलून गाडीत टाकले होते.

या प्रकरणी पोलिस अधिकार्‍यांनी त्या तरूणाला ४६० रूपये दंड करून सोडले होते. मात्र, पोलिसांनी त्याचे नाव शेवटपर्यंत गुप्त ठेवले होते. त्यामुळे हा तरूण नेमका कोण आहे? यांची माहिती मिळालेली नव्हती.

अखेर १५ दिवसानंतर या तरूणाने दै पुढारीच्या प्रतिनिधीला फोन करून आभार मानले. यानंतर या तरूणाचे नाव उमेश वाळेकर असल्याचे स्पष्ट झाले. यावेळी उमेश यांनी माझ्यासारख्या तरूणाला तुम्ही पाठीशी उभे राहून न्याय दिला. शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा केला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद, सर्वाच्या पाठीशी पुढारी नेहमीच असतो. असे म्हणत तो गहिरवरला.

हेही वाचलंत का? 

Back to top button