नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्री व स्वीकृती करण्याची मुदत गुरुवारी (दि.11) संपली. जिल्हाभरातून विविध पदांसाठी तब्बल 305 उमेदवारांनी 410 अर्ज दाखल केले आहे. उपसभापती पदासाठी सर्वाधिक 34 इच्छुकांनी 38, तर सरचिटणीस पदासाठी सर्वांत कमी अर्थात 8 इ्च्छुकांनी 10 अर्ज दाखल केले आहेत. निफाड तालुका संचालकपदासाठी मोठी भाऊगर्दी दिसून येत आहे. त्याठिकाणी 20 इच्छुकांनी 22 अर्ज दाखल केले आहेत.
मविप्र संस्थेच्या पदाधिकारी व संचालक पदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे उमेदवारी देताना दोन्ही पॅनलच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. अध्यक्षपदासाठी 12 उमेदवारांनी 16, उपाध्यक्ष पदासाठी 29 उमेदवारांनी 33, सभापती पदासाठी 10 उमेदवारांनी 16, तर चिटणीस पदासाठी 28 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले आहेत. उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन सेवक संचालक पदासाठी 6 उमेदवारांनी 8, तर प्राथमिक व माध्यमिक सेवक संचालकपदासाठी 15 उमेदवारांनी 21 अर्ज भरले.
अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी डॉ. सुनील ढिकले, अॅड. माणिकराव कोकाटे, उपाध्यक्षपदासाठी राजेंद्र डोखळे, रामदास गायकवाड, दिलीप मोरे, डॉ. विलास बच्छाव, राजेंद्र मोगल, डॉ. सुनील ढिकले, सरचिटणीस पदासाठी अॅड.नानासाहेब जाधव, चंद्रभान बोरस्ते, डॉ. सुनील ढिकले, चिटणीसपदासाठी दत्तात्रेय पाटील, डॉ. प्रसाद सोनवणे, डॉ. सुनील ढिकले, सभापती पदासाठी अॅड. माणिकराव कोकाटे यांनी अर्ज सादर केले. तसेच उपसभापती पदासाठी अविनाश डोखळे, वर्षा बच्छाव, श्रीकांत मते, राजेंद्र मोगल, डॉ. विलास बच्छाव, तर महिला सदस्य पदासाठी अमृता पवार, वर्षा बच्छाव, मनीषा पाटील, सुमन खालकर आदींनी अर्ज भरले.
आज अर्जांची छाननी प्रक्रिया
मविप्र संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा पहिला टप्पा संपला असून, दुसर्या टप्प्याला शुक्रवारी (दि.12) सुरुवात होणार आहे. आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. शनिवारी (दि.13) व रविवारी (दि.14) निवडणूक मंडळाला हरकती नोंदता येणार आहे. सोमवारी (दि.15) स्वातंत्र्य दिनाची सुटी असून, मंगळवारी (दि.16) हरकतींवर सुनावणी होणार असून, त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
तालुका संचालकासाठी अर्ज
तालुका उमेदवार अर्ज
नांदगाव 10 18
सटाणा 15 17
नाशिक ग्रा. 10 14
नाशिक श. 6 10
मालेगाव 10 13
येवला 10 15
निफाड 20 22
देवळा 11 17
चांदवड 6 12
सिन्नर 9 16
दिंडोरी 6 11
कळवण 12 19
इगतपुरी 13 17
महा माध्य सेवक 6 8
प्रा माध्य सेवक 15 21