Mukesh khanna: मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेता मुकेश खन्ना वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाकडून कारवाईची मागणी

Mukesh khanna: मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अभिनेता मुकेश खन्ना वादाच्या भोवऱ्यात, महिला आयोगाकडून कारवाईची मागणी

Published on

पुढारी ऑनलाईन :  मुलींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शक्तिमान फेम अभिनेते मुकेश खन्ना हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यावर दिल्ली महिला आयोगाने मुकेश खन्ना यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. महिला आयोगाने त्यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलला नोटीस बजावून अभिनेत्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. DCW ने अभिनेत्याच्या कथित अपमानास्पद आणि महिलांबद्दल केलेल्या चुकीच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.

व्हायरल झाला व्हिडिओ

अभिनेता मुकेश खन्ना यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये तो असे म्हणताना दिसत आहे की, 'जी मुलगी एका मुलाला सेक्ससाठी विचारत आहे, ती धंदा करते. अशा गोष्टींमध्ये लोकांनी पडू नये. मुकेश खन्ना पुढे म्हणाला की, 'जर एखादी मुलगी असे म्हणत असेल, तर त्याचा सरळ असा अर्थ होतो की, ती मुलगी सुसंस्कृत समाजातली नाही. कारण सुसंस्कृत समाजातली मुलगी असं कधीच म्हणणार नाही.' त्याच्या या कमेंटवर यूजर्स त्याला खूप काही कमेंट करत आहेत.

स्वाती मालीवाल म्हणतात…

दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'हे विधान महिलांबद्दल आक्षेपार्ह आणि द्वेष निर्माण करणारे आहे. 'शक्तीमान हा केवळ हवेत उडून बनत नाही, तर तो महिलांचा आदर करून बनतो. मुलींना 'धंदेवाली' म्हणणे या मुकेश खन्नांच्या वक्तव्यावरून त्यांच्या विचारसरणीतील गरिबी दिसून येते. त्यामुळे त्याच्या या वक्तव्यावर आयपीसीच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महिला आयोगाकडून करण्यात येत आहे. त्यांचा शो पाहून सैतान मुले 'सॉरी शक्तिमान' म्हणायची. पण त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे, असेही स्वाती मालीवाल यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news